
How to change photo on aadhar card: सध्याच्या घडीला भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड असणं बंधनकारक आहे. आधार कार्ड हे देशातील एक महत्वाचं दस्तावेज आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना आधार कार्ड Aadhar Card बाळगणं अनिवार्य आहे. Marathi Tips How to update your aadhar card photo
कोणतंही काम असो मग ते बँकेचं असो किंवा नोकरी, शाळा-कॉलेजमधील प्रवेश, पासपोर्ट, कर्ज, नोकरी, इन्श्युरन्स अशा प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची Aadhar Cardतुम्हाला आवश्यकता भासते. एखादं खासगी काम असो वा सरकारी कागदपत्रांमध्ये आधार कार्ड देणं बंधनकारक आहे.
एवढचं नव्हे कर- कर्जातील सूट असो किंवा एखादी सबसिडी तुम्हाला आधार कार्ड जमा करणं बंधनकारक आहे. आधारकार्ड हे एक महत्वाचं ओळखपत्र Identification Document असल्याने ते कायमच सोबत बाळगणं गरजेचं असतं.
मात्र अनेकांना सार्वजनिक ठिकाणी आधार कार्ड दाखवणं अनेकदा लाजिरवाणं वाटतं आणि यामागचं कारण आहे ते म्हणजे आधार कार्डवरील फोटो. आधार केंद्रावर आधारकार्ड काढतेवेळी लाईव्ह फोटो घेतला जातो. अनेकदा हा फोटो अत्यंत खराब येतो. या खराब फोटोमळे आधार कार्ड दाखवण्याची अनेकदा लाज वाटते.
अनेकजण फोटो बदलण्याची इच्छा असूनही तो बदलत नाहीत. मात्र आता तुम्हाला आधार केंद्रावर न जाताच काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने आधारवरील तुमचा फोटो बदलण्यासाठी फॉर्म भरणं शक्य आहे.
घरबसल्या केवळ काही मिनिटं खर्च करून तुम्ही आधार कार्डवरील फोटो बदलू शकता. UIDIA वर फोटो बदलण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
हे देखिल वाचा-
आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी सर्व प्रथम UIDIA च्या वेबसाइटवर जा.
इथे माय आधारच्या पर्यायवर क्लिक केल्यानंतर त्यातील ENROLMENT-UPDATE_Form वर क्लिक करून तुम्हाला एक फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
या फॉर्ममध्ये तुम्हाला सर्व माहिती अचूक भरावी लागेल. त्यानंतर फ़ॉर्मची प्रिटंआउट काढून तुम्हाला परमनंट एनरोलमेंट सेंटरवर तो जमा करावा लागेल,
सेंटवर पुन्हा तुमची बायोमॅट्रिक डिटेल्स आणि फोटो घेतले जातील.
संपूर्ण प्रक्रियेसाठी १०० रुपये फी आकारण्यात येते.
आधार केंद्राकडून तुम्हाला एक Acknowledgment slip देण्यात येईल.
त्यानंतर साधारणं १५ दिवसात तुमचं आधार अपडेट होईल.
अशा प्रकारे तुम्ही घरीच आधार अपडेट फॉर्म डाउनलोड करून तो भरून त्यानंतर मग केंद्रावर जाऊ शकता. यामुळे तुमच्या वेळीची बचत होईल आणि आधार कार्डवरील तुमचा फोटो देखील बदलला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.