Aadhar Card च्या मदतीने घरबसल्या मिळेल Loan, बँकेच्या फेऱ्या वाचणार

Personal loan with Aadhar card: तुम्ही आधार कार्डचा Aadhar Card वापर करूनही लोन मिळवू शकता. कारण बँक आता आधार कार्डच्या मदतीने केवायसी KYC करू शकते
Personal loan with Aadhar card
Personal loan with Aadhar cardEsakal

Personal Loan with Aadhar card: अलिकडे प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कर्जाची Loan गरज पडतेच. सर्व कागदपत्रांची पुर्तता करून लोन मिळवणं तसं आता कठिण राहिलं नाही.

तुमच्याकडे सर्व कागदपत्र असतील आणि तुम्ही ते लोन फेडण्यास पात्र असाल तर कोणतीही बँक Bank सहज लोन देते. Avail Loan through your Aadhar Card from Banks

मात्र आवश्यक कागदपत्रांमध्येच तुम्हाला ओळखपत्र आणि तुमचा पत्त्याचा पुरावा ही महत्वाची कागदपत्र द्यावी लागतात. आता मात्र तुम्ही आधार कार्डचा Aadhar Card वापर करूनही लोन मिळवू शकता.

कारण बँक आता आधार कार्डच्या मदतीने केवायसी KYC करू शकते. शिवाय आघार कार्डच्या मदतीने कर्ज घेणं आता सोपं झालंय असं म्हणायला हरकत नाही. 

या बँकांमधून मिळू शकतं लोन

आधार कार्डच्या मदतीने पर्सनल लोन घेणं आता अगदी सोप झालं आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक यांसारख्या अनेक बँकचे ग्राहक आधार कार्डवर लोन घेऊ शकतात. यासाठी तुमचा क्रिडिट स्कोर तपासावा लागतो. हे पर्सनल लोन घेण्यासाठी क्रेडिट स्कोर ७५०हून अधिक असणं गरजेचं आहे.

आधार कार्डच्या मदतीने तुम्हाला २ लाखांपर्यंतचं पर्सनल लोन घेता येतं. अनेकदा केवळ ५ मिनिटांमध्येच अप्रूव्हल मिळतं आणि लगेचच लोनची रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होते. Apply personal loan online 

हे देखिल वाचा-

Personal loan with Aadhar card
UPI Pin Change : Debit Card शिवाय UPI पिन कसा बदलायचा?

आधार कार्डच्या मदतीने असं घ्या कर्ज

  • तुमच्या आधार कार्डच्या मदतीने कर्ज घेण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • बँकचं मोबाईल अॅप वापरूनही तुम्ही या पर्सनल लोनसाठी अप्लाय करू शकता.

  • त्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तो तुम्हाला भरावा लागेल.

  • त्यानंतर पर्सनल लोनचा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल.

  • कर्जाची रक्कम आणि इतर माहिती तुम्हाला पुरवावी लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला पॅन कार्डची माहिती विचारण्यात येईल ती तुम्हाला पुरवावी लागेल.

  • त्यानंतर ही सर्व माहिती बँकेकडून क्रॉस चेक केली जाईल. त्यानंतर जर तुम्हाला लोन अप्रूव्ह झालं तर कर्जाची रक्कम काही वेळेत तुमच्या खात्यात जमा होईल. Personal loan on Aadhar Card

बँकेकडून लोन घेणं सोपं असलं तरी यासाठी तुम्ही पात्र असणं गरजेचं आहे. याचाच अर्थ तुम्हाला बँकेच्या काही शर्ती आणि अटींची पूर्तता करावी लागते. जी व्यक्ती लोन फेडण्यास सक्षम असेल अशा व्यक्तीलाच बँक कर्ज देते.

ज्या लोकांकडे कमाईचं साधन आहे अशांना बँक कर्ज देते. तसचं बँकिंग रेकॉर्ड चांगले असणं गरजेचं आहे. यात क्रेडित आणि सीबील स्कोर तसंच बँकेशी चांगले संबंध असणं गरजेचं आहे. 

आधार कार्डवर कर्ज घेत असताना त्यात काही मुख्य सरकारी योजनांचा देखील लाभ घेणं शक्य आहे. सरकारची कर्ज योजना म्हणजेच प्रधानमंत्री आधार कार्ड लोन/मुद्रा योजनेच्या अंतर्गत आधारवर कर्ज दिलं जातं. या योजनेअंतर्गत २ लाखांपर्यंत कर्ज घेणं शक्य आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत आधार कार्डवर कर्ज

प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गतही आधार कार्डच्या मदतीने कर्ज घेणं शक्य आहे. अनेक व्यक्ती एखादा व्यवसाय करण्य़ासाठी बिना सेक्युरीटी आधार कार्डच्या मदतीने २ लाख रुपयांपर्यंतच कर्ज मिळवू शकते.

  • प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात खास करून देशातील छोट्या व्यापाऱ्यांसाठी करण्यात आली होती.

  • या योजने अंतर्गत ३ प्रकारचे कर्ज दिले जातं. ज्याच शिशू, किशोर आणि तरुण असे कर्जाचे प्रकार आहेत.

  • यातील किशोर लोनमध्ये एखादी व्यक्ती ५० हजार रुपयांपासून ५ लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकते.

  • तर एखादा व्यापारी व्यापारासाठी २ लाखांपर्यंत कर्ज मिळवू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com