Marathi Tradition :  गरोदरपणाच्या कितव्या महिन्यात भरतात चोर ओटी, ओटीत केळीला स्थान का नाही?

गोड बातमी आहे हे साधारण तीन महिने होईपर्यंत कोणालाही कळू दिले जात नाही
Marathi Tradition
Marathi Traditionesakal

Marathi Tradition :

घरात गोड बातमी येणार हे समजल्यानंतर घरात उत्साहाचे वातावरण पसरते. गरोदर स्त्रीची काळजी घेणं, तिला काय हवं नको ते पाहणं, तिचे सगळे डोहाळे पुरवणं यात कुटुंबातील सदस्य व्यस्त होऊन जातात. बाळाची चाहुल ही साधारण दिड महिना उलटल्यावरच लागते. त्यामुळे यानंतरच्या काळात गरोदर स्त्रीचे सोपस्कार पार पाडले जातात.

गरोदरपणाच्या साधारण सातव्या किंवा नवव्या महिन्यात डोहाळेजेवणाचा कार्यक्रम केला जातो. त्यादिवशी सासर माहेर अशा दोन्हीकडील महिला तिची ओटी भरतात. तिच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले जातात. तिला खाऊ घातले जातात. हेच आपल्याला माहिती आहे. पण आई होण्याच्या उंबरठ्यावर तिसरा महिना विशेष असतो. (Chor Oti Karykram)

Marathi Tradition
Pregnancy Care : पन्नाशी उलटल्यानंतरचं आईपण! कशी व काय काळजी घ्यावी, तज्ज्ञांकडून जाणून घ्या सर्वकाही

कारण गोड बातमी आहे हे साधारण तीन महिने होईपर्यंत कोणालाही कळू दिले जात नाही. जवळच्या लोकांनाच फक्त याची माहिती असते. याच कारण असं की, तीन महिने होईपर्यंत बाळाची हालचाल, वाढ याकडे गांभिर्याने लक्ष्य द्यावे लागते. तिसऱ्या महिन्यापर्यंत अनेकींचे काही कारणाने गर्भपात होतात. कारण पोटातील बाळाची परिस्थिती नाजूक असते. त्यामुळे ही काळजी घेतली जाते. (Pregnancy Care )

तिसऱ्या महिन्यात चोरओटी का भरतात

तिसरा महिना संपत आला की पोटातील बाळ व्यवस्थित वाढायला लागते.  त्यानंतर बाळाच्या आईची चोरओटी भरतात. चोरओटी अर्थात ही कोणालाही कळू न देता घरच्या मंडळीच्या उपस्थितीतच केवळ भरली जाते. याचा कोणताही मोठा समारंभ करण्यात येत नाही. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुपचूप हा कार्यक्रम करतात.

Marathi Tradition
Pregnancy Care Tips : गर्भावस्थेत जास्त चालण्याचे आहेत अनेक तोटे, अशी घ्या काळजी

चोरओटी कशी भरतात

गरोदर स्त्रीची चोरओटी भरण्याचा मान माहेरच्या लोकांना असतो. लाडक्या लेकीच्या पोटी येणारं बाळ सुखरूप असुदेत, असा आशिर्वाद देत तिची आई मुलीची ओटी भरते. काही ठिकाणी यावेळी ओटीत पाच प्रकारची फळे घालतात. तर काही ठिकाणी पंचामृत म्हणजेच दही,दूध,तूप,मध आणि साखर यांचे एकत्रीत मिश्रण दिले जाते.

या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचा गाजावाजा नसतो. त्यामुळे केवळ ब्लाऊज पीस अन् नारळ लेकीच्या ओटीत घालतात. तसेच, कोणत्याही प्रकारची ज्वेलरी, सजावट या कार्यक्रमाला नसते. (Pregnancy care tips in marathi)

Marathi Tradition
Pregnancy Tips : हिवाळ्यात गर्भवती महिलांनी घ्यावी विशेष काळजी; जाणून घ्या

गरोदर स्त्रीच्या ओटीत केळी का घालत नाहीत

जेव्हा स्त्री गोड बातमी देणार असते. तेव्हा तिच्या ओटीभरणाच्या कार्यक्रमाला सगळी फळे आणली जातात. मात्र केळीचा घड त्यात नसतो. याच कारण असं की, केळीच्या झाडाला एकदाच फळ लागतं. असं फळ मुलीच्या ओटीत घातलं तर तिलाही पुन्हा मुल होणार नाही, अशी जूनी समजूत आहे. त्यामुळे केळी गरोदर स्त्रीच्या ओटीत घालत नाहीत.  (Chor Oti ka bhartat)

Marathi Tradition
Pregnancy Tips : गरोदरपणात काम करताना काय काळजी घ्यावी? वर्किंग वुमनसाठी ‘या’ खास टिप्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com