Diwali : दिवाळीत दारावरती तोरण लावण्याचा काय अर्थ आहे? वाचा सविस्तर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तोरण

Diwali : दिवाळीत दारावरती तोरण लावण्याचा काय अर्थ आहे? वाचा सविस्तर...

दिवाळी म्हटलं की सर्वजण घराची सजावट करतात. पण या सजावटीचा महत्त्वाचा भाग म्हणजे दारी सजणारे तोरण. दारावरती आपण तोरण का लावतो? तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? चला तर मग जाणून घेऊयात.

दारी तोरण म्हणजे हात जोडून स्वागतासाठी उभं असलेलं घर. दारी नवीन तोरण बांधले असेल तर, तिथे शुभकार्य असल्याचे सुसंकेत आपल्याला नकळतच मिळतात. तोरण फक्त प्रवेशद्वाराची सजावट नसून ही भारतीय संस्कृती आहे. हिंदूच नव्हे तर इतर सर्वसंस्कृतींमध्येही प्रमुख्याने दाराच्या चौकटी वरती तोरण बांधले जाते. सकारात्मक ऊर्जा घरात येण्यासाठी आपण दारी तोरण बांधतो. तोरण हे सुचिन्ह असून ते घरात मंगलमय वातावरण निर्माण करते. यामुळे संकटं व आजार दूर राहतात असं मानल जातं. मंगलकार्याच्या वेळी घरात देविदेवतांची सात्विक ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा सूक्ष्म असल्यामुळे तिला आकर्षून घेण्याची क्षमता झेंडूच्या फुलांमध्ये असते, असे मानले जाते. ही ऊर्जा आंब्याच्या पानांद्वारे प्रक्षेपित केली जाते. पारंपारिक तोरण हे झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांपासून बनवले जाते. यामुळे घराभोवतलाच्या हवेचे शुद्धीकरण होते.

हेही वाचा: Dhanteras Puja: कर्जमुक्त व्हायचंय? धनत्रयोदशीच्या दिवशी 'हे' उपाय करा

तोरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फुलांचे विविध रंग हे देखील शुभसंदेश देतात, यामध्ये पानांचा हिरवा रंग हा प्रगती,  समृद्धी, सहनशक्ती, व शांत चे प्रतीक आहे. यामुळे घरात चिंता व तणावविरहित वातावरणनर्मिती होते. केशरी झेंडूची फुले ही पावित्र्याचा, बुद्धिमत्तेचा, सुसंस्कारांचे प्रतीक आहे. तर पिवळ्या रंगांची फुले ही सौभाग्य, संपत्तीचा आणि वैभवाचे निर्देशक मानली जातात.

त्याचबरोबर वर्षभर सजावटीसाठी कृत्रीम तोरण वापरले जाते. यामधील पांढऱ्या रंगाची फुले, मणी, गोंडे  हे शांतता शुद्धता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे. निळा रंग हा विरता, शौर्यता यांचे प्रतीक आहेत. लाल रंग हा शक्तीचे प्रतीक आहे. म्हणून विवाह, गृहप्रवेश आणि इतर समारंभासाठी हा रंग प्रमुख्याने वापरला जातो.