Meesho Sale: मिशोचा भन्नाट सेल! फक्त १७५ रुपयात विकत घ्या पूर्ण आठवड्यासाठीचे परफेक्ट ड्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Budget Friendly Fashion

Meesho Sale: मिशोचा भन्नाट सेल! फक्त १७५ रुपयांत मिळणार पूर्ण आठवड्यासाठीचे परफेक्ट ड्रेस

Budget Friendly Fashion: कपडे हे अशा गोष्टींमध्ये येतात जे कितीही घ्या कमीच वाटतात. शिवाय बाजारात सतत नवीन ट्रेंड्स येत असतात. आपल्यालाही असे ड्रेसेस घ्यावेसे वाटतात पण हे ड्रेसेस अनेकदा परवडतातच असं नाही, सध्या अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खूप ऑफर्स सुरू आहे पण त्यातल्या त्यात मिशोवरची ही ऑफर भन्नाट आहे.

या ऑफरनुसार ऑफिससाठी, कॉलेजसाठी असे परफेक्ट टॉप फक्त १७५ रुपयात तुम्हाला मिळता आहेत. अनेकांनी या प्रोडक्टसच्या खाली कापडाच्या गुणवत्तेच कौतुक देखील केलेलं आहे. गंमत म्हणजे हे टॉप ब्रॅंडेड कपड्यांसारखे सुंदर दिसतात आणि एका खूप मोठ्या मॉलमधून तुम्ही हे कपडे विकत घेतले आहेत असाच फिल देतील.

कॉम्फी रेट्रो वूमन टिशर्ट (Comfy Retro Women Tshirts) या नावाने हे टॉप सर्वांचं लक्ष वेधता आहेत. शॉर्ट स्लीव्ह असलेले हे टॉप आहेत, यात काळा, लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी आणि निळा असे वेगवेगळे रंग आहेत. यावरती तुम्ही हाय वेस्ट जीन्स सुद्धा परिधान करू शकतात. सर्व साईजेस मध्ये हा टॉप उपलब्ध आहे.