
कोल्हापूर : लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. जर तुम्हाला एखाद्या लग्नाच्या फंक्शनमध्ये सामिल व्हायचे असेल तर तयारी करावी लागेल. साधारणत: लग्नाच्या फंक्शनमध्ये महिलांना मेहंदी हाताला लावणे खूप आवडते. परंतु सध्या सुरू असलेल्या covid-19 मुळे आपल्याला एकाच व्यक्तीसमोर खूप वेळ बसून मेहेंदी लावून घेणे कठीण होऊ शकते. त्यामुळे अशावेळी जर तुम्ही स्वतः मेहंदी काढणार असाल तर या डिझाईन्स सोप्या आहेत. ज्या तुम्ही फक्त दहा मिनिटांमध्ये हातावर स्वतः काढू शकता. तर या डिझाईन आपण कोणत्या पद्धतीने काढता येतील ते पाहू ..
मंडला मेहंदी डिझाइन
तुम्हाला जर चांगली मेहंदी काढता येत नसेल तर मंडला मेहंदी डिझाइनची चांगली मदत होईल. या डिझाइनमुळे तुम्ही कमी वेळेत आणि सहजपणे मेहंदी लावू शकता. यामध्ये तळहातावर एक गोल फ्लोरल डिझाइन काढा आणि ते वाढवा. तसचं बोटांना तळहातावरील डिझाइनला मॅच होईल असंच डिझाइन लहान आकारात करू शकता. मेहंदीच्या या डिझाइनमुळे हात जास्त भरलेला दिसणार नाही.
क्रिस-क्रॉस मेहंदी पॅटर्न डिझाइन
कमीत कमी वेळेत मेहंदी काढायची असेल आणि त्याला थोडा हेवी लूक द्यायचा असेल तर क्रिस क्रॉस मेहंदी पॅटर्न डिझाइन निवडू शकता. यामध्ये सिंगल बेलला क्रिस क्रॉस स्टाइलमध्ये हातावर मेंदी काढता येईल. तळहाताशिवाय हाताच्या बाकी भागावर तुम्ही इतरही डिजाइन काढू शकता.
फ्लोरल टिक्की मेहंदी डिझाइन
मेहंदीसाठी ही पारंपरिक स्टाइल आहे. आजही या स्टाइलची क्रेझ महिलांमध्ये आहे. विशेषत: ज्यांना मेहंदी लावता येत नाही त्या फ्लोरल टिक्की मेहंदी डिझाइन निवडू शकता. यामध्ये लहान मोठे ठिपके एकत्र जोडून फुल आणि पानांचा आकार द्या. यामध्ये मेहंदीचं डिझाइन हाताच्या सेंटरवरून लावायला सुरवात करा. फुले, पानांसह इतर डिझाइनही तुम्हाला यामध्ये काढता येतील.
शेडेड मेहंदी डिजाइन
शेडेड मेहंदीचा पर्यायही कमीत कमी वेळेत मेहंदी काढण्यासाठी चांगला ठरू शकतो. यासाठी तुम्हाला हातांवर फ्लोरल मोटिफ डिझाइन तयार करून त्यात मेहंदीने शेड करू शकता. किंवा मेंहदी मोटिफच्या आतही भरू शकता. शेडेड मेहंदी काढण्यासाठी फक्त दहा मिनिटं पुरेसी आहेत.
मोठी फुलं असलेलं डिझाइन
मेहंदी काढायला शिकत असाल तर मोठ्या फुलांची आणि पानांचं डिझाइन निवडता येईल. तुम्ही सहजपणे ही मेहंदी लावू शकाल आणि वेळही कमी लागेल. वेगवेगळ्या डिझाइनही तुम्ही यात ट्राय करू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.