Superfoods For Brain : आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि तणावपूर्ण जीवनशैलीत आपण आपल्या शरीराच्या बाह्य फिटनेसकडे लक्ष देतो, पण शरीराचे कार्य सुरळीत नियंत्रण करणाऱ्या मेंदूच्या पोषणाकडे, आहारकडे आपले दुर्लक्ष होते. .आपल्या मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी योग्य पोषणाची आवश्यकता असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत विसरभोळेपणाची समस्या आताच्या काळात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यावर मात करण्यासाठी मेंदूला सुपरचार्ज, अॅक्टिव करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे..आरोग्यासाठी आहार योग्य असणे गरजेचे असतेच. पण, प्रतेक अवयवासाठी कोणता आहार घ्यावा, तो कधी कोणत्या वेळी खाणे गरजेचे असते हे समजून घेणे अत्यंत आवश्यक असते. मेंदू हा तर आपल्या शरीराचा खूप महत्वाचा अवयव आहे. त्याला रक्त पुरवठा सुरळीत करणारे हे पदार्थ जाणून घ्या..हळद आणि कोमट दूधहळदीमध्ये 'कर्क्युमिन' नावाचे एक महत्त्वाचे घटक असते. हे केवळ मेंदूच्या पेशी तयार करण्यास मदत करत नाही, तर नैराश्यासारख्या, चिडचिडेपणा अशा समस्यांपासूनही संरक्षण देते. हे दूध रात्री प्या. झोपण्यापूर्वी कोमट हळदीचे दूध प्यायल्याने मेंदू निरोगी राहतो आणि शांत झोप लागते..अक्रोड : मेंदूसाठी नैसर्गिक वरदानअक्रोडचा आकार मानवी मेंदूसारखाच असतो. पण तो तेवढाच मेंदूच्या कार्यासाठी फायदेशीर ठरतो. यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आणि मेंदूच्या पेशींना होणारी हानी रोखण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. सकाळी उपाशीपोटी इतर ड्रायफ्रूट खाण्यासोबत भिजवलेले अक्रोड नक्की खा. आठवड्यातून दोनदा तुपात थोडे परतून सुद्धा खाऊ शकता..भोपळ्याच्या बियाबहुतेकदा आपण भोपळ्याच्या बिया फेकून देतो, पण त्यात झिंक आणि मॅग्नेशियमचे पॉवरफुल घटक आहेत. त्यातील मॅग्नेशियम तुमच्यातील नवनवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढवते, तर जस्त मेंदूच्या नसांना सिग्नल पटकन पोहचवण्यास मदत करते..बदाम : स्मरणशक्तीचा खजिनालहानपणांपासून आपण बदाम खावे हे ऐकतो. पण ते खरच खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम हे सर्वोत्तम साधन मानले जाते. नियमित ३ ते ४ बदाम खाल्ल्याने मेंदूच्या पेशी दीर्घकाळ निरोगी राहतात आणि मानसिक आरोग्य सुधारते. बदाम भिजवून खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुरळीत होते..शरीर देतंय इशारा! बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर दिसतात ‘ही’ ८ लक्षणे.पालेभाज्या आणि डार्क चॉकलेटपालक आणि मेथीसारख्या भाज्यांमध्ये लोह आणि व्हिटॅमिन के भरपूर असते. त्यामुळे रोजच्या आहारात एकतरी पालेभाजी असावीच. तसेच डार्क चॉकलेटमधील फ्लेव्होनॉइड्स मेंदूच्या त्या भागात रक्तप्रवाह वाढवतात जिथे आपण गोष्टी लक्षात ठेवतो. विसरभोळेपणा येत नाही. परंतु सतत खाऊ नका. छोटा तुकडाही पुरेसा असतो..डाग अन् पिंपल्स गायब! या टिप्सने घरीच मिळवा कोरियन स्किन ग्लो.आरोग्याच्या दृष्टीने हे पदार्थ आहारात समाविष्ट करा. मेंदू तीक्ष्ण ठेवण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून न राहता, नैसर्गिक सुपरफूड्सचा आहारात समावेश करणे हा दीर्घकालीन फायद्याचा मार्ग आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.