

Rising Trend of Cosmetic Plastic Surgery in Men
sakal
Men Are Now Taking More Interest in Looking Good Through Cosmetic Surgery: उपजत सौंदर्यात अधिक भर घालण्यासाठी वैद्यकशास्त्रात सौंदर्योपचार शाखा उदयास आली. ही शाखा म्हणजे केवळ स्त्रियांचा प्रांत समजला जात होता. मात्र, अलीकडच्या काळात पुरुषांमध्येही सुंदर दिसण्याबाबत जागरूकता व इच्छा वाढताना दिसत आहे. त्यातच बदलत्या वैद्यकीय तंत्रामुळे नवनवीन सौंदर्य उपचारांचे पर्याय उपलब्ध होत असल्याने पुरुषांना सौंदर्योपचारांची भुरळ पडत आहे.