esakal | पुरुषांनी अनुभवला मासिक पाळीतील त्रास; वेदनांमुळे झाली पळताभुई
sakal

बोलून बातमी शोधा

periods 1.jpg

पुरुषांनी अनुभवला मासिक पाळीतील त्रास; वेदनांमुळे झाली पळताभुई

sakal_logo
By
टीम ई सकाळ

स्त्रियांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे मासिक पाळी (periods). दर महिन्याला स्त्रियांना मासिक पाळीच्या त्रासातून जावं लागतं. या ऋतूचक्रामुळे स्त्रीला पूर्णत्व मिळत असलं तरीदेखील महिन्यातील त्या पाच दिवसात तिला असंख्य वेदना (Menstrual Cycle) सहन कराव्या लागतात. अनेकदा पोटात दुखणं, प्रचंड रक्तस्राव होणं(Bleeding), मूड स्विंग्ज होणं(Mood Swings) असा बराच त्रास त्यांना जाणवत असतो. खरं तर या सगळ्याची स्त्रियांना सवय झाली असते. परंतु, अनेक पुरुष आजही या गोष्टींवरुन स्त्रियांची खिल्ली उडवतात. म्हणून या काळात स्त्रियांना होणाऱ्या त्रासाचा एक कृत्रिम प्रयोग पुरुषांवर करण्यात आला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (men try a period cramp simulator see reaction in video)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही पुरुषांवर पीरियड क्रॅम्प स्टिम्युलेटर (Period Cramp Stimulator) या यंत्राच्या सहाय्याने एक प्रयोग करण्यात आला. या यंत्राचा शरीराला स्पर्श झाल्यानंतर मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना होणाऱ्या वेदना जाणवू लागतात. हा प्रयोग स्त्री व पुरुष अशा दोघांवरही करण्यात आला. परंतु, स्त्रियांना या यंत्रामुळे जराही त्रास झाला नाही. तर, तुलनेने पुरुषांना बराच त्रास सहन करावा लागला.

हेही वाचा: वाऱ्यामुळे तुटला Glass bridge; ३३० फुटांवर लटकला पर्यटक

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही पुरुषांवर पीरियड क्रॅम्प स्टिम्युलेटर (Period Cramp Stimulator) या यंत्राच्या सहाय्याने एक प्रयोग करण्यात आला. या यंत्राचा शरीराला स्पर्श झाल्यानंतर मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना होणाऱ्या वेदना जाणवू लागतात. हा प्रयोग स्त्री व पुरुष अशा दोघांवरही करण्यात आला. परंतु, स्त्रियांना या यंत्रामुळे जराही त्रास झाला नाही. तर, तुलनेने पुरुषांना बराच त्रास सहन करावा लागला.

यंत्राच्या 'लेव्हल10'वर पुरुषांना प्रचंड त्रास जाणवू लागला. त्यामुळे अनेकांनी हे यंत्र हटवण्यास सांगितलं तर, स्त्रियांना हा त्रास काहीच नसल्याचं म्हटलं. विशेष म्हणजे 'तुम्ही एवढ्या वेदना कशा सहन करु शकता?', असा प्रश्न एका मुलाने स्त्रियांना विचारला. तर, हा त्रास काहीच नाही. मला, मासिक पाळीच्या काळात यापेक्षा कैकपटीने जास्त त्रास होतो, असं एका महिलेने सांगितलं.

दरम्यान, मासिक पाळी व स्त्रियांना होणाऱ्या वेदना यांच्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अनेकांनी या व्हिडीओचं कौतुक केलं असून स्त्रियांप्रतीचा आदरही व्यक्त केला आहे.

loading image
go to top