... या क्षणी पुरूष हमखास खोटं बोलतात

खोटं बोलणाऱ्यांपैकी ४० टक्के जण आपल्या जोडीदाराशी प्रतारणा करतात. उर्वरीत ६० टक्के जण केवळ खोटंच बोलतात.
man vs woman
man vs womangoogle
Updated on

इंग्लंडच्या पोर्ट्समाऊथ विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासानुसार महिलांच्या तुलनेत पुरुषांना खोटं बोलण्याची सवय जास्त असते. रोज आपल्या पत्नीशी एखाद-दुसऱ्या वेळेस खोटं बोलणं ही पुरुषांसाठी फार मोठी गोष्ट नसते. या अभ्यासातून असंही लक्षात आलं आहे की, खोटं बोलणाऱ्यांपैकी ४० टक्के जण आपल्या जोडीदाराशी प्रतारणा करतात. उर्वरीत ६० टक्के जण केवळ खोटंच बोलतात.

पुरुषांच्या खोटं बोलण्याच्या सवयीला महिलांची संशय घेण्याची सवय कारणीभूत असल्याचंही समोर आलं आहे. बऱ्याचदा पुरूष आपल्या पत्नी खूष करण्यासाठीही खोटं बोलतात. हे असं खोटं बोलणंही चुकीचंही म्हणता येत नाही. आता अशा काही गोष्टी पाहू या ज्या पुरूष कधीच मान्य करत नाहीत.

I can't live without you
I can't live without yougoogle

मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही...

बायको माहेरी जायला निघाली की नवरा प्रेमाने हे वाक्य उच्चारतो; मात्र खऱ्या भावना वेगळ्याच असतात. बायको घरात नसताना पुरुषांना लग्नापूर्वीचे आयुष्य पुन्हा अनुभवण्याची संधी मिळते. शिवाय बायकोसमोर जे करता येत नाही ते या काळात करता येते.

man  looking another girl
man looking another girlgoogle

मी तिच्याकडे बघत नव्हतो....

सुंदर मुलीकडे एकटक बघितल्यानंतरही पुरूष हे मान्य करत नाहीत की ते तिला बघत होते. बायकोसमोर तर मुळीच नाही; कारण एखाद्या मुलीकडे बघताना त्यांची पापणी लवत नव्हती हे जर बायकोला कळलं तर ती चांगलीच संतापेल. उठता-बसता टोमणे तर मारेलच शिवाय बाहेर कुठेही गेले असता नवऱ्यावर सतत लक्ष ठेवून राहील.

man vs woman
लग्नानंतरही पुरूष फ्लर्ट का करतात? 5 कारणे वाचा
smoking
smokinggoogle

मी सिगारेट सोडली...

सिगारेटचं रिकामी पाकीट समोर आलं की पुरूष हमखास खोटं बोलतात. आपल्याला सिगारेट ओढायची सवय असल्याचं ते मान्यच करत नाहीत. बायकोला किंवा प्रेयसीला पुरुषांच्या खिशात सिगारेटचं रिकामी पाकीट मिळालं की आपण सिगारेटची सवय खूप आधीच सोडली असल्याचे पुरूष सांगतात.

man vs woman
चूक असूनही पुरूष Sorry का बोलत नाही? 'ही' ५ कारणे असू शकतात
relationship
relationshipgoogle

लैंगिक संबंधांविषयी सगळी माहिती असल्याचा बनाव...

बरेचसे पुरूष आपल्याला लैंगिक संबंधांविषयी सर्व काही माहीत असल्याचा आव आपल्या जोडीदारासमोर आणतात; मात्र जास्तीत जास्त पुरुषांना सुरक्षित लैंगिक संबंधांविषयी काहीच माहिती नसते. असे पुरूष आपल्या जोडीदारासमोर खोटं-खोटं वागतात; पण यामुळे त्यांची जोडीदार खूष राहाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com