Mens Short Kurta Fashion : तरूणांनो तीच स्टाइल करून कंटाळलात? शर्ट्समध्ये आलाय हा नवा ट्रेंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mens Short Kurta Fashion

Mens Short Kurta Fashion : तरूणांनो तीच स्टाइल करून कंटाळलात? शर्ट्समध्ये आलाय हा नवा ट्रेंड

Mens Short Kurta Fashion : मुलांचे कपडे म्हटले की आधीच स्टॉक लिमिटेड होऊन जातो, रेग्युलर वेअर मध्ये म्हटलं तर टी शर्ट, जीन्स, शर्ट एवढेच प्रकार असतात. त्यातल्या त्यात जरा फॅशन करायचं म्हटलं तर, राऊंड नेक टी शर्ट वर एखादा शर्ट किंवा डेनीमच जॅकेट. जर सेलेब्रिटींना फॉलो करायच म्हटल तर एक वेळेस एथेनिक वेअर करताही येईल पण रोजच्या वापरासाठी काहीही सापडत नाही.

अशातच सध्या एक नवीन ट्रेंड बाजारात आला आहे, आणि ते म्हणजे छान फॅब्रीकचे शॉर्ट कूर्ते. प्लेन राऊंड नेकचे फूल स्लीव कूर्ते सध्या सगळ्याच तरुणांच्या मनात घर करता आहेत आणि त्याच वेगळ आकर्षण सुरू आहे. गंमत म्हणजे तुम्ही हे कूर्ते ऑफिस वेअर साठीही एखाद्या शुक्रवारी वगैरे घालू शकतात. लोकं हे कूर्ते रोजच्या वापरासोबत, ट्रेकिंग साठी, पार्टी साठी, बीच वर घालायला, छोट्या मोठ्या पूजेसाठी अशा वेगवेगळ्या ठिकाणी घालता आहेत. बघूया असेच काही शॉर्ट कूर्ते

प्लेन कुर्ता

निळ्या रंगाचा हा कुर्ता मुळात प्लेन असल्यामुळे कुठेही जाईल असा आहे. अगदी ऑफिस साठीही हा जाऊ शकतो. घरात पूजा असेल, मंदिरात जायच असेल तेव्हाही तुम्ही हा कुर्ता घालू शकतात.

ईकत कुर्ता

ईकत स्टाइल कुर्त्याची सध्या सगळीच कडे ट्रेंड सुरू आहे. मुलीही ईकतचे कूर्ते घालं पसंत करता आहेत. ईकत हा फॅब्रीकचा एक प्रकार आहे. यात काळ्या रंगाचा स्लीम फीट कुर्ता तुम्हाला उठून दिसेल.

पोलका डॉट कुर्ता

पोलका डॉट हा एक फॅब्रिक प्रकार सध्या खूप चालतो आहे. रेड मारून कलरचा पोलका डॉट कुर्ता खाली कॉटन जीन्स आणि हातात स्मार्ट वॉच, नक्कीच एक स्टनिंग लुक तयार करू शकतो.

संगेनरी प्रिंट कुर्ता

संगेनरी प्रिंट म्हणजे, कारागिराकडून केली जाणारी ब्लॉक प्रिंट. जर तुम्हाला बेसिक सोबर लुक पेक्षा हटके लुक हवा आहे तर हा लुक फक्त तुमच्या साठी आहे; पूर्ण कुर्त्यावर छान ब्लॉक प्रिंट असते आणि दोन रंगाच सुंदर कॉम्बिनेशन सुद्धा. या खाली तुम्ही जीन्स किंवा धोती पॅन्टही घालू शकतात.