esakal | Monsoon Fashion For Men: फॅन्सी-स्टाईलिश लूकसाठी फॉलो करा 7 टिप्स
sakal

बोलून बातमी शोधा

Monsoon Fashion For Men : फॅन्सी लूकसाठी फॉलो करा 7 टिप्स

Monsoon Fashion For Men : फॅन्सी लूकसाठी फॉलो करा 7 टिप्स

sakal_logo
By
शरयू काकडे

खिडकीत किंवा बाल्कनीतून पाहिल्यावर पाऊस खूप सुंदर वाटतो. मॉन्सूनचे आगमन होते तेव्हा छान हवेत ओलावा, वाहणारा वारा, सगळीकडे हिरवळ असे वातवारण होऊन जाते. हे पण वातवरण घरांच्या 4 भितींमध्ये बसूनच छान वाटते. तुम्ही पावसाळ्याचा आनंद लुटत असला तरी कोठेही भिजत जाण्याची कल्पना देखील नको वाटते. एकदा तुम्ही भर पावसात घराच्या बाहेर पाऊल टाकले की समजते की शहरातील उदास आणि कंटाळवाणे वातावरण अनुभवल्यावर खरे आव्हान सुरू होते. रस्त्यावरील पाणी, चिखल, वाहते पाणी हे सर्व पाहून आणखी वैताग येतो. त्यात मॉन्सूमध्ये कोणते कपडे घालावे, कोणते नाही काहीच समजत नाही. पावसाळ्यात आपल्याला फॅशन ट्रेंड फॉल करणे तसे थोडे अवघडच असते. त्यामुळे पावसाळ्यात फॅशन ट्रेंड फॉलो करताना थोडा मॉन्सूनच्या हिशोबाने करावा. महिलांसाठी फॅन्सी राहण्याचे कित्येक पर्याय उपलब्ध असतात त्यामुळे आज पुरुषांसाठी पावसाळ्यात फॅशन फॉलो करण्याचे काही पर्याय देणार आहोत. (7 Monsoon Fashion tips For Men That Will Amp-Up Your Style Game)

1. कॉटनचे कपडे वापरा.

मॉन्सूनमध्ये कॉटन कपडे हा फॅशन आणि कम्फर्टच्या दृष्टीने चांगला पर्याय दिसतो. लाईट वेट फॅब्रिकचे कपडे भिजल्यानंतर तुमच्या अंगाला चिटकत नाही आणि लवकर सुकतात. त्यामुळे ते कपडे स्वच्छ राहातात आणि त्यांना दुर्गंधीही येत नाही. चिनोज् स्टाईल पॅन्टवर तुम्ही कॉटन शर्ट वापरू शकतो. वुलन किंवा लिननचे कपडे वापरणे टाळा अन्यथा, तुम्हाला नंतर पश्चाताप होईल कारण ते पावसात भिजल्यानंतर आकसतात

2. डेनिमचे कपडे वापरु नका

तुमच्या आवडीचे डेनिमचे कपडे सुकविण्यासाठी त्रास होतोय का? जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर हे कपडे वापरणे बंद करा. डेनिमचे कपड्यांना पुरुषांची पसंती असते. त्यामुळे सहसा सर्व पुरुषांकडे असे कपडे असतात. पण तुम्ही थोडा विचार करा की, मॉन्सूनमध्ये डेनिमचे कपडे घालून बाहेर पडल्यानंतर जर तुम्ही पावसात भिजला तर हे कपडे सुकविण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यापेक्षा तुमच्या डेनिम जिन्स ऐवजी चिनोज वापरा जी वजनाने हलकी असते आणि पटकन सुकते.

3.छोटे कपडे वापरा

तुमच्या कपाटात धूळ खात पडलेल्या शॉर्ट आता बाहेर काढण्याची वेळ आली आहे. शॉर्ट्स हे सर्वात आरामदायी कपडे आहेत. तुम्ही शार्टस् वर चांगले शूज वापरुन मस्त लूक ट्राय करु शकता. तुम्ही शॉर्टवर टी शर्ट किंवा लाईट रंगाचे शर्ट वापरु शकता.

4. छत्री

तुम्हाला ऐकायला थोड विचित्र वाटेल पण तुमच्या जवळ असलेली छत्री ही तुम्हाला सर्वात हटके लूक ट्राय करण्यासाठी मदतशीर ठरेल. तुम्हाला पावसापासून वाचविण्यासाठी छत्री उपयुक्त ठरेलच पण मॉन्सून स्टाईलमध्ये हे महत्वाचे साधन(अॅक्ससरीज) ठरतेय. तुम्ही आणि तुमची बॅग पावसामध्ये भिजणार नाही अशी छत्री घ्या. काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची छत्री निवडा कारण लाकडी हॅन्डल असलेल्या या छत्री सर्वात स्टाईलिश मानली जाते.

5. वॉटरप्रुफ जॅकेट्स

तुम्हाला छत्री सह वॉटर प्रुफ जॅकेट्सचाही वापर करु शकता. त्यामुळे बाजारात जाऊन तुम्हाला योग्य दिसेल असे छान जॅकेट घ्या. भारतामध्ये वॉटर प्रुफ जॅकेट्स फॅशन समजले जात नाही तुम्हाला सगळ्यांपेक्षा वेगळ दिसायचे नाही का? जर तुमच उत्तर हो असेल तर लाईट रंगाचे वॉटर प्रुफ जॅकेट्स वापरा.

6. वॉटरप्रुफ वॉच

तुम्हाला जर फॅशन फॉरवर्ड मॅन म्हंटलेले आवडत असेत तर पावसाळ्यात गरजेच्या वस्तूंमध्ये वॉच हे लिस्टमध्ये घेऊन टाका. तुमच्याकडे आधीच वॉच असेल तर तुम्हाला स्टाईलिश आणि वॉटर प्रुफ वॉच सोबत बदलण्याची आवश्यकता आहे.

7. वॉटरप्रुफ शूज

यंदाच्या पावसळ्यात तुम्ही वॉटर प्रुफ शुज घेऊन टाका. कारण पावसाळ्या तुमच्या शरिराला जितकी जपण्याची गरज असते तितकीच गरज तुमच्या पायांना जपण्याचीही असते. वॉटरप्रुफ शुज कम्फर्टेबल असतात पण तुम्हाला पाण्यापासून देखील वाचवतात. इतकेच नव्हे तर तुम्हाला स्टाईल आणि फॅशनबल लूक देखील करता येतो. वॉटर प्रुफ शूज निवडताना डार्क किंवा ब्राईट रंग निवडा.

loading image
go to top