esakal | मासिक पाळीदरम्यान शरीरसंबंध ठेवू नये? जाणून घ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं
sakal

बोलून बातमी शोधा

मासिक पाळीदरम्यान शरीरसंबंध ठेवू नये? जाणून घ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं

मासिक पाळीदरम्यान शरीरसंबंध ठेवू नये? जाणून घ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं

sakal_logo
By
शरयू काकडे

मासिक पाळीमध्ये 70 ते 80 टक्के महिलांना खूप त्रास होतो. कोणाचे खूप पोट दुखते तर कोणाचे कमी. काही महिलांना तर इतका त्रास होतो की त्या बेशुध्द होतात. मासिक पाळीमध्ये त्रास होणे चांगली लक्षण नाही असे मानतात पण यामध्ये काहीही तथ्य नाही. तुम्हाला पिरिएड्स संबधीत गैरसमज देखील आहेत ते आम्ही दूर करणार आहोत.

हेही वाचा: तुमचा Ethnic Look होऊ शकतो खराब, टाळा नेहमी होणाऱ्या फॅशन मिस्टेक

मासिक पाळीमध्ये आंबट किंवा गोड पदार्थ खाऊ नये ?

मासिक पाळीमध्ये आंबट पदार्थ खाऊ नये यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. आंबट खाद्य पदार्थांमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते, जे इम्युनिटी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतात. मासिक पाळीच्या काळात थंड पदार्थ प्रमाणात खाले पाहिजेत कारण या काळात होणाऱ्या गॅसच्या समस्या असतात. थंड पदार्थ खाताना थोडे संयम ठेवला पाहिजे.

मासिक पाळी दरम्यान गर्भवती राहता येत नाही?

मासिक पाळी दरम्यान गर्भवती राहणे अशक्य नाही. जेव्हा तुमची मासिक पाळे नियमित असतात तेव्हा गर्भवती राहण्याची शक्यता आणखी वाढते. मासिक पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी गर्भवती राहू शकतात. तसेच जर मासिक पाळी दरम्यान ब्लिडिंग जास्त होते तेव्हा गर्भधारणेची शक्यता जास्त असते.

हेही वाचा: तुमच्या 'या' चार सवयी गर्लफ्रेंडला ठरु शकतात त्रासदायक

मासिक पाळीच्या काळात व्यायम करावा का?

मासिक पाळीच्या काळात व्यायाम केल्याने त्रास वाढू शकतो असे मानले जाते व्यायम केल्याने त्रास कमी होतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार सोपे व्यायम, योगासन निवडू शकतो.

मासिक पाळी दरम्यान शरीर संबध ठेवू नये?

मासिक पाळी दरम्यान शरीर संबध ठेवावे की नाही हा पुर्णपणे तुमचा निर्णय आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर मासिक पाळीदरम्यान शरीर संबध ठेवण्यामध्ये कोणतीही अडचण नाही पण योग्य काळजी घेणे गरजेची आहे हे लक्षात ठेवा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

loading image
go to top