High Pillow Side Effects: जाड उशीमुळे केवळ मानेचे त्रास होतात असे नाही, होतील हे गंभीर आजार

निरोगी आणि सक्रिय राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे.
sleeping
sleeping sakal
Updated on

निरोगी आणि सक्रिय राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे. कारण निद्रानाशाचा तुमच्या दैनंदिन कामावर वाईट परिणाम होतो आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. लोक झोपताना सर्वात आरामदायक मुद्रा निवडतात.

झोपण्याचा प्रत्येकाचा आवडता प्रकार असतो. काही लोक झोपताना उशी वापरतात, तर काही लोक उशीशिवाय झोपणे पसंत करतात. याशिवाय काही लोक असे आहेत ज्यांना दोन उशी किंवा जाड उशी वापरल्याशिवाय झोप येत नाही.

असे बरेच लोक आहेत ज्यांना जाड उशी घेऊन झोपायला आवडते. म्हणूनच ते दोन उशी घेऊन झोपतात. तुम्ही देखील या लोकांपैकी एक आहात का? जर उत्तर हो असेल तर समजून घ्या की तुम्ही तुमच्या शरीराशी खेळत आहात. जाड उशी घेऊन किंवा दोन उशा एकत्र घेऊन तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, जाड उशी घेऊन झोपल्याने तुम्हाला या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

sleeping
Monsoon Flying Insects: पावसाळ्यात घरात शिरणाऱ्या किड्यांपासून सुटका हवीये? मग हे उपाय नक्की ट्राय करा

जाड उशी घेऊन झोपण्याचे तोटे

1. मानदुखी: जाड उशी घेऊन झोपल्याने मान दुखू शकते. या वेदनामुळे तुमची दैनंदिन कामे कठीण होऊ शकतात. जर तुम्हाला मानदुखीच्या समस्येचा सामना करायचा नसेल तर नेहमी पातळ आणि मऊ उशाच वापरा.

2. पाठीचा कणा दुखणे: जाड उशी घेऊन झोपल्याने मणक्याचे दुखणे देखील होऊ शकते. कारण जाड उशीमूळे मणक्याला त्रास होतो.

3. ब्लड सर्कुलेशन: जाड उशी घेऊन झोपल्याने डोके उंच होते, त्यामुळे कवटीत ब्लड सर्कुलेशन नीट होत नाही. एवढेच नाही तर केसांना योग्य पोषणही मिळत नाही.

4. हात आणि खांदे दुखणे: जे लोक उंच उशी घेऊन झोपतात त्यांच खांदे आणि हात दुखण्याची समस्या अनेकदा दिसून येते. सकाळी उठल्याबरोबर अनेकजण खांदे दुखत असल्याची तक्रार करतात. हे टाळण्यासाठी नेहमी मध्यम आकाराची उशी वापरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.