Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

Met Gala 2024 : सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलेला मेट गाला हा एक चॅरिटी कार्यक्रम आहे. हे बहुधा अनेकांना माहित नसेल.
Met Gala 2024
Met Gala 2024esakal

Met Gala 2024 : सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरलेला मेट गाला हा एक चॅरिटी कार्यक्रम आहे. हे बहुधा बऱ्याच जणांना माहित नसेल. मंगळवारी या मेट गालाच्या रेड कार्पेटवर अनेक कलाकारांनी त्यांच्या अनोख्या फॅशन स्टाईलमध्ये हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या अनोख्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

या मेट गाला कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हा आहे की, ‘द मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी (The Metropolitan Museum of Art’s Costume Institute) निधी उभा करणे. हा कार्यक्रम पारंपारिकपणे वार्षिक फॅशन प्रदर्शनाचे उद्घाटन म्हणून साजरा केला जातो.

विशेष म्हणजे या मेट गाला कार्यक्रमामध्ये नेमके काय घडते? हे एक सीक्रेट आहे. कारण, येथे आमंत्रित केल्या जाणाऱ्या पाहुण्यांना नो-फोन पॉलिसी पाळावी लागते. आज आपण या मेट गाला कार्यक्रमाची थीम काय आहे? आणि ती कोण ठरवत? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

मेट गाला कार्यक्रमाची थीम कोण ठरवत?

मेट गाला या कार्यक्रमाची थीम मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूटशी (The Metropolitan Museum of Art’s Costume Institute) संबंधित लोकांद्वारे दरवर्षी ठरवली जाते. विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी या थीममध्ये वैविध्य दिसून येते.

दरवर्षी या इन्स्टिट्यूटच्या लोकांची एक पॅनेल बैठक असते. ज्यामध्ये थीम काय असावी? याबद्दल चर्चा केली जाते आणि अंतिम निर्णय घेतला जातो. यंदाची मेट गालाची थीम ही ‘स्लीपिंग ब्युटीज : रिअवेकनिंग फॅशन’ (Sleeping Beauties : Reawakening Fashion) अशी आहे. (Who decides the theme of the Met Gala?)

यंदाचा ड्रेस कोड काय आहे?

मेट गाला २०२४ चा यंदाचा ड्रेस कोड हा ‘द गार्डन ऑफ टाईम’ असा आहे. विशेष म्हणजे यंदाच्या प्रदर्शनात कॉस्च्युम इन्स्टिट्यूटच्या कायमस्वरूपी संग्रहातून घेतलेल्या अंदाजे २५० दुर्मिळ वस्तूंचा समावेश असेल.

दरम्यान, कॉस्च्युम इन्स्टिट्यूटचे प्रभारी वेंडी यू क्युरेटर, अँड्र्यू बोल्टन यांनी सांगितले की, यंदाचा मेट गाला निसर्गाला दिलेली एक अनोखी श्रद्धांजली आहे. त्यामुळे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कलाकार हे आकाश, पृथ्वी, प्राणी, निसर्ग, फुले-पक्षी यांच्याशी संबंधित थीम असलेले कपडे परिधान करून आले आहेत. (What is the dress code for this year?)

मेट गाला २०२४ चे आयोजन कुणी केले ?

यंदाच्या मेट गाला २०२४ चे आयोजन झेंडया, जेनिफर लोपेझ, बॅड बनी, ख्रिस हेम्सवर्थ इत्यादी कलाकारांनी केले आहे. या मेट गालामध्ये जगभरातून आलेले अनेक कलाकार आपापल्या कलाप्रकारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येतात.

या वर्षी भारतातील अनेक दिग्गज कलाकारही आले आहेत, यासाठी त्यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे. यंदा सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी पहिल्यांदाच मेट गालामध्ये उपस्थित राहणार आहेत. ( Who organized Met Gala 2024)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com