
Midi Skirt Trend: कॅज्युअल लूक करायचाय तर मिडी स्कर्टशिवाय बेस्ट ऑप्शन नाही!
जून्या काळात अभिनेत्रींमूळे प्रसिद्ध झालेल्या स्टाईल्स पून्हा पून्हा ट्रेंडमध्ये येत आहेत. त्यात आता स्कर्ट आणि मिडीचीही फॅशन आली आहे. स्कर्ट मिडी हा फ्रॉकचाच एक प्रकार आहे पण त्यातील शर्ट आणि मिडी हे वेगवेगळे असतात.
सध्या कोणत्याही मिडीवर कोणताही टॉप, टीशर्ट किंवा एखादा फॉर्मल शर्टही तरूणी घालत आहेत. त्यामूळे एकच जीन्स जशी अनेक टॉपवर चालते तसेच एकाच मिडीवर अनेक प्रकारचे, पॅटर्नचे शर्ट वापरता येतात. परदेशात जसे तरूणी शॉर्ट स्कर्ट घालतात. अगदी तशीच पण थोडी लाँग मिडी असते. मिडी स्कर्ट कॅरी करणे खूप सोपे आहे आणि वर्षाच्या प्रत्येक सीझनमध्ये मिडी स्कर्ट चालतो. तूम्ही तूमच्या लहानपणी असे ड्रेस घातले असतीलच. पण तरूणपणी ते घातल्यावर सोबर आणि क्यूट दिसण्यासाठी काही टीप्स पाहुयात.
टॉप आणि स्कर्ट
सध्या स्कर्ट जीन्स प्रमाणेच वापरले जात आहे. कोणत्याही स्कर्टवर मॅचिंग होईल असेच टॉप निवडा. कारण, उगीचच वेगळे काहीतरी घालू नका. फ्लॉवर डिझाईन असेल त्यावर प्लेन टॉप वापरा. सध्या स्कर्टवर स्वेटशर्ट घालण्याचा ट्रेंडही आहे.
मिडी स्कर्टवर शूजच घाला
तुमच्या मिडी स्कर्टवर नेहमी शूजच घाला. स्कर्टच्या उंचीनूसार तुमचे शूज लक्ष वेधून घेतील याची काळजी घ्या. मिडी स्कर्टबरोबर कधीही फ्लिप-फ्लॉप, बेसिक फ्लॅट्स किंवा अगदी साधे सँडल्स किंवा चप्पल घालू नका. त्याने तुमचा लूक छान दिसणार नाही. स्ट्रेपचे सँडल किंवा हिल्सही वापरू शकता.
मिडी स्कर्टवर कॉम्बिनेशन
सैल क्रॉप टॉप व फिट डेनिम स्कर्ट असे कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय करू शकता. व्हेल्वेट स्कर्ट, बटन-डाउन स्कर्ट किंवा फ्रिली स्कर्ट यांसारखे इतर टेक्श्चर देखील वापरून पहा. फक्त या मिडी स्कर्टबरोबर तुमचा टॉप प्लेन आणि सिम्पल ठेवा. या लूक बरोबर तुम्ही आयमेकअपवर फोकस करू शकता.