मिलिंद सोमणचा आईसह Squats करतानाचा व्हिडिओ पाहिलात का? Fitness Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिलिंद सोमणचा आईसह Squats करतानाचा व्हिडिओ पाहिलात का?
मिलिंद सोमणचा आईसह Squats करतानाचा व्हिडिओ पाहिलात का?

मिलिंद सोमणचा आईसह Squats करतानाचा व्हिडिओ पाहिलात का?

वयाच्या 81 व्या वर्षी संकदफू ट्रेक करणारी सर्वात वयोवृद्ध (छेछे तरुण महिला) महिला, तसेच मिलिंद सोमणची आई उषा सोमण. या आई-मुलाच्या जोडीने रविवार गाजवला तो स्क्वॅट्स एकत्र करून. मिलींदच्या बरोबरीने त्याच्या आई उषा याही व्यायाम करत असलेले फोटो प्रसिद्ध करत असतात. त्यांचे हे फोटो पाहून अनेकांना प्रेरणा मिळते. रविवारी मिलिंदने सोशल मिडियावर आईसह व्यायाम करतानाचा व्हिडिओ शेअर केला.

व्हिडिओमध्ये मिलिंद आणि त्याची आई उषा त्यांच्या दिवाणखान्यात अनवाणी उभे आहेत. त्यानंर त्यांनी त्यांनी 10 स्क्वॅट्स एकत्र केले. यावेळी मिलिंदने निळ्या रंगाचा टी शर्ट, राखाडी रंगाच्या शॉर्ट्स घातल्या होता. तर त्याच्या आईने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. या जोडीने हा व्हिडिओ पाहणाऱयांना त्यांच्या आईसह व्यायाम करण्याचा सल्ला दिला. मिलिंदने व्हिडिओला कॅप्शन दिले, “फिट राहण्यासाठी कोणताही अडथळा नाही!! हे सिद्ध करण्यासाठी यापेक्षा चांगले उदाहरण आहे का?

squats करण्याचा असा आहे फायदा
आपण हालचाल करत असताना सर्वाधिक उपयोग पाय आणि नितंबाचा करतो. त्यामुळे एकूणच शरीर मजबूत राखणे गरजेचे असते. यासाठी स्क्वॅट्स करणे फायद्याचे ठरते. शरीराचे संतुलन राखून लहान स्नायूंची इजा टाळण्यास मदत करता. शरीराचे असंतुलन होत नाही. उलट शरीराची ताकद वाढवते. तसेच पाय आणि ग्लूट्स टोन करते आणि मुख्य स्नायू मजबूत करते. तसे पायाला झालेली दुखापतही यामुळे बरी होते. मधुमेह, हृदयरोग, संधिवात हे आजार यामुळे दू राहू शकतात. तसेच पोटाचे फॅट्स कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो.

loading image
go to top