

Why Millennials and Gen-Z Are Dating Across Generations
esakal
Millennial and Gen-Z Dating Trends: डेटिंग जगतामध्ये सतत नवीन बदल पाहायला मिळत असतात. सामान्यतः मिलेनियल (Millennials) पिढीतील लोक इतर मिलेनियल जोडीदारासोबतच डेटिंग करताना दिसतात. पण, सध्या एक नवीन आणि वेगळाच ट्रेंड समोर आला आहे, ज्यामध्ये मिलेनियल आणि Gen-Z पिढीतील तरुण एकमेकांना डेट करत आहेत. याला 'क्रॉस-जेनेरेशनल डेटिंग' (Cross-generational dating) असे म्हटले जात आहे.
जरी अनेकांना ही गोष्ट थोडी वेगळी किंवा विचित्र वाटत असली, तरी भारतात सक्रियपणे डेटिंग करणाऱ्या तरुणांनी या नव्या ट्रेंडचे काही सकारात्मक (Pros) आणि नकारात्मक (Cons) पैलू उघड केले आहेत.