प्रवासाच्या दरम्यान कमीत कमी मेकअप प्रोडक्ट बरोबर ठेवायचे आहे तर फक्त या तीनच गोष्टी बरोबर ठेवा

minimum of makeup products with you during the trip just keep these three things with you tips marathi news
minimum of makeup products with you during the trip just keep these three things with you tips marathi news

कोल्हापूर :जेव्हा आपण दूरवरच्या प्रवासाला जातो किंवा दिवसभर बाहेरच राहणार असतो त्यावेळी आपण आपली बॅग शक्यतो हलकी ठेवतो. परंतु अनेक वेळा समजत नाही की यामध्ये काय ठेवावे आणि काय ठेवू नये. खास करून स्किन केअर, स्किन प्रॉडक्ट च्या बाबतीत अनेक वेळा संभ्रमावस्था होते. जर तुम्हाला टचपॅड ची गरज असेल तर अशावेळी तुम्हाला अनेक प्रॉडक्ट्स बरोबर ठेवावे लागतात. अशावेळी तुम्ही सर्व प्रोडक्ट बरोबर ठेवावे असे नाही. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रवास करताना आपल्याला अनेक वेळा बॅग ही स्वतःलाच उचलावी लागते. त्यामुळे त्यामध्ये कमीत कमी साहित्य असणे आवश्यक असते. याशिवाय आपल्याला आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी या बॅगेमध्ये समाविष्ट करायच्या असतात. जसे चाव्या, फोन, वॉलेट, इयरफोन. यासाठीच जेव्हा मेकअपचा विषय येतो तेव्हा तुम्हाला खास टिप्स देत आहोत. ज्या मधून तुम्ही चांगले मेकअप ही करू शकाल आणि तुमच्या बॅगेचे वजन ही कमी राहील.

टिंटेड लिपबाम: ओठाच्या सुरक्षिततेसाठी हे प्रोडक्ट अत्यंत जरुरी असते. जे आपण नेहमी आपल्या पर्समध्ये ठेवत असतो. आपले ओठ जर फुटलेले असतील तर ते दिसताना खूप वाईट दिसते. यासाठी आपण त्याची विशेष सुरक्षा पाहत असतो. टिंटेड लीप बाम हे तुमचे उठ फुटण्यापासून ही रोखते. त्याचबरोबर आपल्या ओठाला एक सुंदर कलर देते. आपले व्यक्तिमत्त्व चांगले खुलून दिसण्यासाठी त्याचबरोबर आपला चेहरा फ्रेश दिसण्यासाठी आपण याचे ब्लश आणि आयशाडो सारखे ही उपयोग करू शकतो.


फ्रेगरेंस :तुम्ही फिरण्यासाठी बाहेर  जाण्याचे नियोजन करत असाल त्यावेळी तुमच्याजवळ एक चांगल्या प्रकारचे बॉडी स्प्रे असणे जरुरी असते. जेव्हा तुम्हाला खूप घाम येतो त्यावेळी हे प्रॉडक्ट  आवश्यक असते. घामामुळे आपल्या शरीराला दुर्गंधी येते आणि ही दुर्गंधी कमी करण्यासाठी हा स्प्रे उपयोगी ठरतो. तुम्ही स्कार्फ वर त्याचा स्प्रे करा आणि हे स्कार्फ केसांना बांधून घ्या. यामुळे तुम्हाला निरंतर सौम्य स्वरूपात एक चांगला सुगंध येत राहतो आणि यामुळे मन प्रसन्न राहते.


एसपीएफ़ : एस पी एफ सनक्रीम न लावता तुम्ही बराच वेळ घराच्या बाहेर पडू शकत नाही. सूर्याच्या उष्णतेमुळे आपल्या त्वचेला हानी पोहोचते. यामुळे आपल्या त्वचेचे रक्षण करण्यासाठी घरातून बाहेर पडताना सनक्रीम जरूर लावा. तसे पाहिले तर जेव्हा आपण जास्त वेळेसाठी बाहेर जातो तेव्हा प्रत्येक तासाला सन क्रीम लावणे आवश्यक आहे. सन क्रीमचे मिनी स्प्रे सध्या बाजारात मिळतात व हा पर्याय आपल्याला प्रवासामध्ये अनुकूल ठरतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com