भारतात या ठिकाणी साजरी होत नाही दिवाळी, काय आहे कारण?

दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये दिवाळी साजरी केली जाते.
diwali
diwaliesakal
Updated on
Summary

दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. तथापि, या राज्यांमध्ये भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्यामुळे दिवाळी साजरी केली जाते. विशेषतः तामिळनाडूमध्ये नरक चतुर्दशीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्तर भारतात, नरक चतुर्दशीच्या दिवशी यम द्वितीया साजरी केली जाते.

दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. यंदा 4 नोव्हेंबरला दिवाळी आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की धनाची देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. धार्मिक ग्रंथांनुसार, त्रेतायुगात, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम लंकामध्ये राजा रावणाचा पराभव करून कार्तिक अमावस्येच्या दिवशी माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परत आले. त्यावेळी सर्व अयोध्येतील जनतेने प्रभू श्रीरामांच्या आगमनानिमित्त त्यांच्या पाहुणचारात दीपप्रज्वलन करून दिवाळी साजरी केली. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक महिन्यात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीला दीपावली असेही म्हणतात. देशभरात दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. तथापि, असे एक राज्य आहे. जिथे दिवाळी साजरी होत नाही. तुम्हाला माहीत नसेल तर चला मग जाणून घेऊयात त्याबद्दलचे काही रंजर गोष्टी.

diwali
गरिबांच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी तरुणांनी धुतल्या गाड्या

देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र, दक्षिण भारतात असलेल्या केरळ राज्यात दिवाळी साजरी केली जात नाही. स्थानिक तज्ञ म्हणतात की, ही एक आख्यायिका आहे की केरळचा राजा बली याचा दिवाळीच्या दिवशी मृ्त्यू झाला आहे. त्यामुळे केरळमध्ये दिवाळी साजरी होत नाही. राजा बलीच्या मृत्यूनंतर दिवाळी साजरी न करण्याचा नियम आहे.

diwali
दिवाळी करायची कशी? सरकारने दिवा नाही, तर किमान पणती तरी द्यावी

सध्या तरी केरळच्या काही ठिकाणी दिवाळी साजरी केली जात नाही. त्यामुळे दिवाळीनिमित्त केरळमध्ये कोणतीही धावपळ सुरु नाहीयेय. तसेच, दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. तथापि, या राज्यांमध्ये, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याच्या पार्श्वभूमीवर दिवाळी सण साजरा केला जातो. उत्तर भारतात, नरक चतुर्दशीच्या दिवशी यम द्वितीया साजरी केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com