Miss Universe 2022 : मिस यूनिवर्स आधीही असतात 'या' ब्युटी कॉम्पिटिशन; वाचा यादी..

अशा कोणकोणत्या कॉम्पिटिशन्स असतात?
Miss Universe 2022
Miss Universe 2022sakal
Updated on

Miss Universe 2023 : कोणतीही गोष्ट आपल्याला थेट येत नाही.. अगदी शाळेतही कोणी थेट दहावीची परीक्षा देत नाही.. हळूहळू शाळेत प्रत्येका वर्गातून पुढे जात आपण दहावीची तयारी करत असतो. ब्युटी कॉम्पिटिशन बाबतही आपण तसंच काहीसं म्हणू शकतो.

आता मोबाइल आणि इंटरनेटमुळे सर्वांना याच्या प्रोसीजर माहिती असतीलच. पण यासाठी असं कोणतं शिक्षण नाही; काही प्रायव्हेट क्लासेस आहेत पण तेही प्रत्येकाला शक्य आहेच असं नाही. याशिवाय एक खूप सोपा आणि उत्तम पर्याय म्हणजे वेगवेगळ्या ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणे. (Miss Universe 2023 Read the list of all Beauty competition)

अशा कोणकोणत्या कॉम्पिटिशन्स असतात?

१. बेसिक कॉम्पिटिशन

कोणीही डायरेक्ट कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही.. मुळात त्यासाठी जरा माहिती हवी आणि आपलं बेसिक पक्क करण्यासाठी तुम्ही कॉलेज लेव्हेल ब्युटी कॉम्पिटिशन, छोटे मोठे रॅम्प वॉक, फॅशन शो करणं गरजेच असतं.. यातूनच तुम्हाला अनुभव येतील आणि यातले सर्टिफिकीट तुम्हाला पुढे कामात येतील.

२. डिस्ट्रिक्ट लेव्हल

सर्वात बेसिक स्पर्धा म्हणजे डिस्ट्रिक्ट लेव्हल ब्युटी कॉम्पिटिशन. ही कॉम्पिटिशन तुमच्या जिल्ह्यापर्यंत मर्यादित असते आणि तिथलेच लोकं ती कॉम्पिटिशन भरवतात. याच्या अशा अधिकृत संस्था नसल्या तरी यातून तुमचा स्टेज फियर जाईल आणि कॉन्फिडन्स येईल.

Miss Universe 2022
Rishabh Pant Health Update : उर्वशीपेक्षा तिच्या आईलाच ऋषभची काळजी, 'माझ्या...'

३. स्टेट लेव्हल

स्टेट लेव्हेल वरही अनेक संस्था अशा स्पर्धा घेत असतात; काही मीडिया पब्लिशर सुद्धा या स्पर्धा कंडक्ट करत असतात. याचा आणखीन एक फायदा म्हणजे तुम्हाला काही प्रोक्ट्स साठी मॉडेलिंग करण्याची आणि त्यांचे ब्रॅंड अॅम्बेसेडर सुद्धा तुम्ही होऊ शकतात.

४. फेमिना मिस दिवा

मिस युनिवर्ससाठी भारताकडून कोण रिप्रेझेंट करेल हे फेमिना मिस इंडिया असोसीएशन ठरवतं. यासाठी तुम्हाला मिस दिवा नावाची स्पर्धा जिंकावी लागते. मिस दिवा ही फेमिना मिस इंडिया स्पर्धेचा एक भाग आहे जी प्रामुख्याने मिस युनिव्हर्ससाठी भारताच्या प्रतिनिधींची निवड करते.

Miss Universe 2022
Miss Universe 2022sakal

५. मिस यूनिवर्स

मिस युनिव्हर्स ही सर्वात मोठी आणि दुसरी सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय ब्युटी कॉम्पिटिशन आहे जी जून 1952 मध्ये पॅसिफिक मिल्स या कॅलिफोर्नियाच्या कपड्यांच्या कंपनीने सुरू केली होती. ही ब्युटी कॉम्पिटिशन मिस युनिव्हर्स संस्थेद्वारे प्रशासित केली जाते आणि सध्या WME/IMG च्या मालकीची आहे. मिस युनिव्हर्स जगात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काम करते.

Miss Universe 2022
Miss Universe 2021: हरनाज संधूच्या 'या' उत्तराने जिंकली परीक्षकांची मनं

सारासार विचार करता सगळ्या ब्युटी कॉम्पिटिशन्सचे काही निकष ठरलेले असतात.. जसे की,

१. तुमच वय १८ ते २७ मध्ये आहे

२. तुमच लग्न झालेलं नाहीये किंवा तुम्ही कोणत्याही आपत्याच पालकत्व घेतलेलं नाहीये

३. तुम्ही भारताचे नागरिक आहात

४. तुम्ही मेंटली आणि फिजिकली फिट आहात..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com