Mobile Side Effects : स्मार्टफोन देण्यासाठी मुलाचं योग्य वय किती असावं?

लहान मुलांना किती वेळ मोबाईल द्यावा?
Mobile Side Effect
Mobile Side Effectesakal

Mobile Side Effects : सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या जगात मोबइलच्या एका क्लिकवर जगभरातील माहिती कळते. प्रत्येक गोष्टीबाबत माहिती आपल्याला हवी असेल तर ती सहज उपलब्ध होते. गेल्या वर्षभरापासून तर करोनासारख्या महाभयंकर विषाणूमुळे शाळांना देखील टाळं लागलं आहे.

अशा परिस्थितीमध्ये मुलं मोबाइलचा आधार घेत ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. ऑनलाइन शिक्षण या काळात फायदेशीर जरी ठरत असलं तरी बहुतांश मुलं अधिक वेळ मोबाइलवरच काही ना काही करताना दिसतात. खरं तर मोबाइल म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामधील अविभाज्य भाग बनला आहे.

Mobile Side Effect
Parenting Tips : पालकांनो मुलांना स्पेशल फिल द्या, वाढवा तुमची व्हॅल्यू

अनेकदा पालकांच्या मनात प्रश्न पडतो की कोणत्या वयात मुलांना पहिल्यांदा स्मार्ट फोन द्यायचा? किती काळ? मोबाईल द्यायचा की नाही? यापैकी कोणत्याही प्रश्नाचे अचूक उत्तर कोणताही डॉक्टर सांगू शकत नसला तरी अमेरिकेच्या सेपियन्स लॅबने नुकताच एक अभ्यास केला आहे. पहिल्या स्मार्टफोनचे वय आणि मानसिक आरोग्य परिणाम असे या अभ्यासाचे नाव आहे.

या सर्वेक्षणात मानसिक आरोग्य गुणांक म्हणजेच मानसिक आरोग्य गुण देऊन लोकांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. सर्वेक्षणाचे निकाल सांगत आहेत की, जितक्या लहान मुलांनी स्मार्ट फोन हातात घेतला, तितक्याच त्यांच्या मानसिक समस्या निर्माण होऊ लागल्या. संशोधनानुसार, या प्रकरणात जितका विलंब होईल तितका चांगला.

Mobile Side Effect
Parenting Tips : वयात येणाऱ्या मुलांवर सतत लक्ष ठेवून त्यांना सुधारता येत नाही!

संपूर्ण सर्वेक्षण जाणून घ्या

हे सर्वेक्षण 40 देशांतील लोकांवर करण्यात आले. 18 ते 24 वयोगटातील 27 हजार 969 लोकांवर हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात भारतातील 4 हजार लोकांचा सहभाग होता. सर्वेक्षणात सहभागी असलेल्या 74 टक्के महिलांवर केलेल्या विश्लेषणात त्यांना नैराश्य आणि तणावाचा त्रास असल्याचे दिसून आले. या महिलांना 6 वर्षांपेक्षा कमी वयात स्मार्ट फोन मिळाला.

वयाच्या 10 व्या वर्षी स्मार्ट फोन घेतलेल्या महिलांपैकी 61% मानसिक समस्यांनी ग्रस्त असल्याचे आढळून आले. त्याच वेळी, वयाच्या 15 व्या वर्षी पहिल्यांदा स्मार्टफोन घेतलेल्या 52% महिला या मानसिक आजाराला बळी पडल्याचे दिसून आले.

जाणून घ्या पुरुषांची स्थिती काय असते?

6 वर्षापूर्वी स्मार्टफोन भेटलेल्या 42% पुरुषांचा तणावामुळे मृत्यू झाला. वयाच्या १८ व्या वर्षी, पहिल्यांदा स्मार्टफोन वापरणाऱ्या ३६% पुरुषांना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले.

कोणत्या मानसिक समस्या?

  • अधिक राग येणे

  • मरण्याचे विचार

  • एकटेपणा वाटणे

  • मॅकफीचे सर्वेक्षण

Mobile Side Effect
Parenting Tips : पालकांच्या या सवयींचा मुलांवर पडतो वाईट प्रभाव

नुकतेच, मॅकफीने भारतात एक सर्वेक्षण केले, ज्यामध्ये असे आढळून आले की भारतातील 10 ते 14 वयोगटातील 83% मुले स्मार्टफोन वापरत आहेत. 15 वर्षांवरील 88% मुले स्मार्टफोन वापरत आहेत. आंतरराष्ट्रीय सरासरीबद्दल बोलत असताना, ते 76% आहे. भारतातील 48% मुले त्यांच्या मोबाईल चॅट किंवा वापर खाजगी ठेवतात.

म्हणजेच ते त्यांच्या स्मार्टफोनची स्क्रीन त्यांच्या पालकांपासून लपवतात तर जागतिक सरासरी 37% या बाबतीत आहे. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे भारतातील केवळ ४७% पालक आपल्या मुलांकडून स्मार्टफोनच्या वापराबद्दल चिंतेत आहेत.

स्मार्टफोनमध्ये काय समस्या आहे?

मार्च 2022 मध्ये, इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने संसदेत ठेवलेल्या डेटामध्ये सांगितले की भारतातील 24% मुले झोपण्यापूर्वी स्मार्टफोन तपासतात आणि 37% मुले लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेसह संघर्ष करत आहेत.

2015 मध्ये केलेल्या एम्सच्या मूल्यांकनात, 10 टक्के शाळकरी मुलांमध्ये मायोपिया दिसला होता, परंतु 2050 पर्यंत, भारतातील सुमारे निम्मी मुले मायोपियाचे बळी झाले असतील. त्याचा थेट संबंध मोबाईलच्या स्क्रीन लाईटशी सापडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com