Smartphone मध्ये सतत Password द्यावा लागतोय? या सेटिंगमुळे काम होईल सोपं

स्मार्टफोन वापरत असताना तो वारंवार लॉक होत असल्याने तो सतत अनलॉक करावा लागत असल्याने ते त्रासदायक ठरू शकतं. यासाठी तुम्ही स्मार्ट लॉक एनेबल हा पर्याय वापरून या महत्वाच्या मात्र कंटाळवाण्या कामातून पर्यायी मार्ग काढू शकता
स्मार्टफोन अनलाॅकिंग फिचर
स्मार्टफोन अनलाॅकिंग फिचरEsakal
Updated on

मोबाईल फोन किंवा आपल्या हातातील स्मार्टफोन हे सध्या एक अत्यंत महत्वाचं गॅजेट आहे. केवळ संवाद साधण्यासाठी नव्हे तर इतर अनेक महत्वाच्या कामांसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. अगदी फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी, विविध कागदपत्रांच्या स्टोरेजसाठी तसचं मोबाईल बँकिंग किंवा UPI च्या मदतीने पैशांचे व्यवहार करण्यासाठी मोबाईलचा Mobile वापर केला जातो. Mobile Usage Hacks how to keep your smartphone unlocked

यासाठी स्मार्टफोनचा डेटा Smartphone Data सुरक्षित ठेवणं सध्या गरजेचं देखील बनलं आहे. स्मार्टफोनमधील सर्व डेटा किंवा अॅप Mobile App सुरक्षित रहावे यासाठी प्रत्येकजण पासवर्ड, पॅटर्न लॉक किंवा पिन लॉकच्या मदतीने स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. या विविध प्रकारच्या लॉकमुळे मोबाईल इतरांच्या हातात असल्यासही भिती राहत नाही.

अनेकजण मोबाईलच्या स्क्रिन लॉकसोबतच विविध अॅपसाठी देखील लॉकचा वापर करत असतात. मात्र काही वेळेस स्मार्टफोन वापरत असताना तो वारंवार लॉक होत असल्याने तो सतत अनलॉक करावा लागत असल्याने ते त्रासदायक ठरू शकतं. यासाठी तुम्ही स्मार्ट लॉक एनेबल हा पर्याय वापरून या महत्वाच्या मात्र कंटाळवाण्या कामातून पर्यायी मार्ग काढू शकता.

अँड्राॅइड स्मार्टफोनसाठी हे फिचर येईल कामी

अँड्राॅइड फोन वापरत असताना वारंवार पासवर्ड टाकणं हे कंटाळवाणं काम वाटू शकतं. ही समस्या सोडवण्यासाठी अँड्राॅइड फोनमध्ये एक खास फिचर देण्यात आलं आहे. या फिचरचं नाव आहे स्मार्ट लॉक फिचर. या स्मार्ट लॉक फिचरच्या मदतीने तुम्ही मोबाईल काही तासांसाठी अनलॉक ठेवू शकता.

हे देखिल वाचा-

स्मार्टफोन अनलाॅकिंग फिचर
Smartphone : स्मार्टफोन जवळ घेऊन झोपणे असुरक्षित

जेव्हा मोबाईल तुमच्याच हातात राहणार असेल किंवा तुम्ही एकटेच आहात अशावेळी तुम्ही स्मार्टलॉक फिचरचा वापर करू शकता. हे फिचर तीन प्रकारे काम करत.

ऑन बॉडी डिटेक्शन

ट्रस्टेड प्लेसेस trusted places

ट्रस्टेड डिव्हाइस trusted devices

हे फिचर एनेबल केल्यान तर तुम्ही स्मार्टफोन एकदा अनलॉक केल्यानंतर काही तासांसाठी अनलॉक ठेवू शकता. खास करून वॉकिंग किंवा मुव्हिंग पोझिशनमध्ये मोबाईल अनलॉक राहिल.

म्हणजेज मोबाईल हाताळला जात आहे, तो एकाजागी स्थिर नाही, तोवर तो अनलॉक राहील. जेव्हा तुम्ही स्मार्टफोन एका जागी ठेवाल तेव्हा तो लॉक होईल. स्मार्ट लॉक अनलॉक केल्यानंतर मोशनमध्ये तो ४ तासांसाठी अनलॉक राहिल.

ट्रस्टेड प्लेस पर्याय- हे फिचर इनेबल केल्यानंतर युजर ऑफिस किंवा घरी तुम्ही ४ तासांसाठी फोन अनलॉक ठेवू शकता. हा ऑप्शन तुमच्या लोकेशनवर आधारित असतो. तुम्ही घर किंवा ऑफिसपासून ठराविक मीटर दूर जाताच मोबाईल अनलॉक होतो.

ट्रस्टेड डिव्हाइस पर्याय- trusted devices पर्यायाच्या मदतीने तुम्ही मोबाईल ब्लूटूथ किंवा स्मार्टवॉचला कनेक्ट केल्यानंतर ४ तासांसाठी अनलॉक ठेवू शकता. या ट्रस्टेड डिव्हासमधून स्मार्टफोन डिसकनेक्ट होताच मोबाईल लॉक होईल.

असं वापरा स्मार्ट लॉक फिचर

हे फिचर ऑन करण्यासाठी सर्वप्रथम Setting मध्ये जा.

सिक्युरिटी पर्याय निवडून स्मार्ट लॉकचा पर्याय क्लिक करा.

इथे तुम्हाला वर सांगण्यात आलेले ३ पर्याय दिसतील.

यामध्ये तुम्हाला हवा असलेला योग्य पर्याय तुम्ही ऑन करू शकता.

अशा प्रकारे स्मार्ट लॉक फिचरच्या मदतीने तुम्हाला मोबाईल सतत अनलॉक करण्याची गरज भासणार नाही.

हे देखिल वाचा-

स्मार्टफोन अनलाॅकिंग फिचर
Smartphone Recording : तुमचा स्मार्टफोन गुपचूप रेकॉर्ड करतोय तुमचं बोलणं; लगेच बंद करा ही सेटिंग!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com