Mobile Battery Life: या Apps मुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर उतरतेय, तेव्हा आजच डिलीट करा हे Apps

tips for saving your mobile battery life: मोबाईलची बॅटरी लवकर संपेल या भितीने अनेकदा आपण मोबाईलचा वापर मर्यादित करू लागतो. खरं तर मोबाईलमधील विविध अॅप Mobile Apps वापरत असताना बॅटरी खर्च होत असते
Mobile Battery Life
Mobile Battery LifeEsakal

Mobile Battery Life: आपल्या हातातील स्मार्टफोन Smartphone हा आता केवळ एखाद्या व्यक्तीला कॉल करण्यापूरता मर्यादीत राहिलेला नाही. तर हा एक मल्टिटास्किंग डिव्हाइस म्हणून काम करतो. Smart Phone Use Tips Marathi Which apps consume maximum mobile battery

मोबाईलवरून Mobile आपण कॉलिंगसोबतच चॅट करणं, सोशल मीडिया Social Media, चॅटिंग, बँकिंग, टास्क मॅनेजमेंट, शॉपिंग, गेमिंग, सिनेमा पाहणं अशी अनेक काम करतो. मोबाईलचा अनेक गोष्टींसाठी दिवसभरात वापर होत असल्याने अर्थात यासाठी बॅटरी Mobile Battery देखील खर्च होते.

दिवसभर घराबाहेर असताना अनेकदा मोबाईलची बॅटरी टिकवून ठेवणं हा एक मोठा टास्क असतो. मोबाईलची बॅटरी लवकर संपेल या भितीने अनेकदा आपण मोबाईलचा वापर मर्यादित करू लागतो. खरं तर मोबाईलमधील विविध अॅप Mobile Apps वापरत असताना बॅटरी खर्च होत असते. मोबाईलमधील असे अनेक अॅप्स आहेत जे मोठ्या प्रमाणात बॅटरी खर्च करतात.

अनेक शॉपिंग अॅप्स पासून ते सोशल मीडिया अॅप्स आणि गेमिंग अॅप्समुळे बॅटरी मोठ्या प्रमाणात खर्च होते. अशाच काही अॅप्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. यातील तुम्हाला गरजेचे नसलेले अॅप्स डिलीट केल्यास तुमचा बॅटरी बॅकअप वाढण्यास मदत होऊ शकते.

हे देखिल वाचा-

Mobile Battery Life
Useful Mobile Apps: तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत 'हे' अ‍ॅप्स, मिनिटात होतील अनेक कामं

Candy Crush Saga: कॅन्डी क्रश या गेमने लहान किंवा तरुणांनाच नव्हे तर अगदी मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील व्यक्तींना वेड लावलं आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय गेम्समध्ये याचा समावेश होतो. पण तुम्हाला माहित आहे का या गेममुळे मोठ्या प्रमाणात बॅटरी वापरली जाते. एवढचं नव्हे तर डेटा Mobile Data देखील मोठ्या प्रमाणात खर्च होतो.

Pet Rescue Saga- पेट रेस्क्यू सागा हे देखील एक अत्यंत लोकप्रिय गेमिंग अॅप आहे. या गेममुळे देखील मोबाईलची बॅटरी लवकर ड्रेन होते तसचं डेटा देखील जास्त वापरला जातो.

Google Play Services: मोबाईल खरेदी केल्यानंतर अनेकदा गुगल प्ले सर्विसेस हे अॅप इनबिल्ट मिळतं. हे अॅपदेखील मोठ्या प्रमाणात बॅटरी कंज्युम करत. त्यामुळे जर तुम्ही या अॅपचा वापर करत नसाल तर ते Uninstall करून टाका. यामुळे तुमच्या मोबाईलचा बॅटरी बॅकअप वाढण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

Mobile Battery Life
Mobile Vibration : खिशात मोबाईल व्हायब्रेट होत असल्याचा होतोय भास? गंभीर आजाराचं आहे लक्षण

Clash of Clans: या गेमिंग अॅपमुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी अगदी झपाट्याने उतरेल. तसंच हे गेमिंग अॅप अनेक तास खिळवून ठेणारे असल्याने मोबाईलचा बॅटरी बॅकअप कमी होतो.

Facebook- सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया अॅपपैकी फेसबुक या अॅपमुळे मोबाईल बॅटरी लवकर ड्रेन होते. सध्याच्या काळात फेसबुक वापर नाही असे फार कमी लोक आढळतील. प्रत्येक जण फेसबुकचं पेज दिवसातून ७-८ वेळा तरी स्क्रोल करतात. अशात बॅटरी उतरण्याची शक्यता वाढते.

OLX- जुन्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी या अॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र हे अॅपदेखील मोबाईलची बॅटरी जास्त प्रमाणात कंझ्यूम करतं.

WhatsApp – कदाचित तुम्ही गेमिंग अॅप वापरत नसाल. मात्र व्हाट्सअप हे सध्याच्या घडीला सर्वाधिक वापरलं जाणारं अॅप आहे. जगातील लोकप्रिय असं हे चॅटिंग अॅप तुमच्या मोबाईलची बॅटरी एखाद्या स्पंजप्रमाणे शोषून घेते.

या अॅप्सच्या वापरामुळे तसंच या अॅप्सच्या नोटीफिकेशन्समुळे देखील मोबाईलची बॅटरी झपाट्याने उतरते. म्हणूनच आवश्यकता नसल्यास सर्वप्रथम अॅप्सचे नोटीफिकेशन बंद करा. शिवाय बिना कामाचे अॅप्स डिलीट करा. यामुळे मोबाईलचा बॅटरी बॅकअप वाढण्यास मदत होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com