Monsoon : पावसाळ्यात आजारी नसेल पडायचे ,तर अशी घ्या काळजी..

पावसाळ्यात हवेमुळे अन् पाण्यामुळे कोण कोणते आजार होऊ शकतात माहिती आहे का ?
Monsoon
Monsoon esakal

Monsoon : अल्हाददायक वाटणारा आणि मन प्रसन्न करणारा ऋतू म्हणजे पावसाळा. हा पावसाळा जितका अल्हाददायक असतो तितकाच आजारांना निमंत्रण देणाराही असतो.

पावसाळ्यात व्हायरस, जीवाणू आणि इतर संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे अनेकदा डासांच्या माध्यमातून संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. सोबतच उघडयावरचे अन्न , हवा ,दूषित पाणी यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. म्हणून पावसाळ्यात आपण आपली शारीरिक काळजी घेणं गरजेचं आहे.

आज आपण पावसाळ्यात नेमके कोणते आजार होतात आणि ते आजार दूर ठेवण्यासाठी नेमके काय करावे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम पाहू या पावसाळ्यात नेमके कोणते आजार होऊ शकतात ?

1) चिकुनगुनिया (Chikungunya)

हा विषाणू एडीस जातीच्या डासांद्वारे स्वच्छ पाण्यात निर्माण होऊन पसरतो. यात दोन-तीन दिवस ताप येतो, डोके दुखते, अंगावर विशेषतः पाठ,पोट,कंबर या भागांवर पुरळ येते आणि हातापायांचे सांधे विलक्षण दुखू लागतात. हे दुखणे अतिशय तीव्र प्रमाणात असते. पायांचे घोटे, गुडघे, तळपायांचे सांधे यांना या आजारात विशेषकरून त्रास होतो. साधे चालणे, पायांची मांडी घालणेसुध्दा वेदनाकारक होते. आजार बरा झाला तरी पुढील बराच काळ हे हात-पाय दुखणे सुरूच राहते.

2) मलेरिया (Malaria)

हा आजार अ‍ॅनोफेलस जातीच्या डासांच्या मादीमुळे होतो. साचलेल्या पाण्यात, डबक्यात या डासांची पैदास होते. ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणे आणि घामही येणे ही या रोगाची लक्षणे आहेत.

3) डेंग्यू (Dengue)

पहाटे तसेच सकाळच्या वेळी डास चावल्याने होणा-या या आजारात सततची डोकेदुखी, खूप ताप, पुरळ आणि सांधे व स्नायूंमध्ये वेदना उद्भवतात.पहिल्या लक्षणांमध्ये ताप आणि थकवा यांचा समावेश आहे. डेंग्यू तापासाठी विविध प्लेटलेट मॉनिटरिंग करणे आवश्यक आहे.

Monsoon
पावसाळ्यात तुमच्या कारची काळजी कशी घ्याल? फॉलो करा सोप्या टिप्स

आता पाहू या दुषित पाण्यामुळे कोणते आजार होऊ शकतात ?

1) टायफाइड (Typhoid)

हा दुषित पाण्यामुळे पसरणारा आजार आहे. ताप, डोकेदुखी, सांधेदुखी आणि घसा खवखवणे ही या आजाराची लक्षणे आहेत. टायफॉइड तापाची चाचणी करण्यासाठी टायफाइड टायफी आयजीएम आणि विडल एग्लूटिनेशन या चाचण्या करणे आवश्यक आहे.

2) लेप्टोस्पायरोसिस (Leptospirosis)

त्वचेवर कुठे चिरलेले असेल किंवा तुमच्या डोळे, तोंड आणि नाक यांच्या माध्यमातून तुमच्या शरीरात प्राण्यांचे मूत्र किंवा प्राण्यांचे मूत्र असलेले पाणी गेले तर हा भयानक आजार होऊ शकतो. काहीही लक्षणं दिसून न येणे इथंपासून डोकेदुखी, स्नायूतील वेदना आणि पार फुफ्फुसात रक्‍तस्त्राव किंवा मेंदूदाह ही या आजाराची लक्षणे आहेत.

3) हिपेटायटीस (Hepatitis)

विषाणूमुळे होणारा हा खूपच संसर्गजन्य आजार आहे. पाण्यातून पसरणारा हा विषाणू असून बाधित विष्टेमुळे दूषित झालेल्या अन्‍न वा पाण्यामुळे हा आजार बळावतो. त्यामुळे कावीळ होण्याची शक्यता असते. त्या मध्ये पेंशटचे डोळे आणि त्वचा पिवळी होते तसेच पोटदुखी, भूक मंदावणे, अन्‍नावरील इच्छाच उडणे, ताप, डायरिआ आणि अशक्‍तपणा जाणवतो.

4) व्हायरल फिव्हर (viral fever)

यामध्ये सुरुवातीस तीव्र स्वरूपाचा ताप, अशक्तपणा जाणवणं, अंगदुखी हाता-पायांमध्ये वेदना होणं ही प्राथमिक लक्षणं दिसून येतात.

Monsoon
Video: पावसाळ्यात आरोग्य बॅलन्स ठेवण्यासाठी या ५ गोष्टी महत्वाच्या

आता पाहू या हवेतून कोणते आजार होऊ शकतात ?

पावसाळ्यात सरदगरद वातावरणामुळे सामान्य फ्लू, विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे बहुतेकदा कमी अधिक प्रमाणाता आढळून येतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याची शक्यता असते.

संसर्गाच्या संक्रमणापासून दूर राहण्यासाठी खालील गोष्टींचे काटेकोरपणे पालन करा.

1) खोकताना किंवा शिंकताना तोंडावर आणि नाकावर रुमाल ठेवावा.

2) पावसाळ्यात शक्य होईल तर उकळून थंड केलेले पाणी प्यावे.

3) घरातील लहान मुलांना संसर्ग संक्रमित व्यक्तींपासून दूर ठेवावे आणि घरात स्वच्छता राखावी.

4) घरातील प्रत्येक खोलीत हवा खेळती ठेवण्याचा प्रयत्न करावा.

5) घरातील प्रत्येक व्यक्तीला आणि स्वतःला सतत हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करावा.

6) संतुलित आहार घ्या आणि तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याचा प्रयत्न करा

7) बुरशीजन्य आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी सदैव वैयक्तिक स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य द्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com