

Experts advise avoiding cut fruits, roadside food and contaminated water during the rainy season to reduce the risk of infections.
Sakal
वैष्णवी ठिगळे
पावसाळा हा ताजेपणाचा, हिरवाईचा ऋतू आहे. मात्र या काळात आर्द्रता वाढल्यामुळे पचनशक्ती कमी होते, संसर्गजन्य आजार वाढतात, रोगप्रतिकारक शक्तीवर ताण येतो आणि सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार यांचा धोका वाढतो. अशा वेळी हंगामानुसार उपलब्ध होणारी फळे आणि भाज्या खाणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. हंगामी अन्नपदार्थांमध्ये शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे नैसर्गिकरीत्या उपलब्ध होतात आणि ते रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. पावसाळ्यात खायची हंगामी फळे व त्यांचे फायदे बघूयात.