Monsoon Special: पावसाळ्यात सिल्क साडीची काळजी कशी घ्यावी याकरिता खास 7 टिप्स...

चुकूनही सिल्कच्या साडीवर पाणी शिंपडू नका.
Silk saree
Silk sareeEsakal

ऋतू कोणताही असो लग्न किंवा इतर कार्यक्रमांना जावंच लागतं, आणि कार्यक्रमाला जायचं म्हणजे महिलांना चांगल्या साड्या नेसून मस्त नटून थटून बाहेर जायला आवडतात.

सध्या बाजारात सिल्कच्या साड्यांचे अनेक प्रकार येत आहे. आणि महिला मंडळी त्या साड्या आवडीने खरेदी सुध्दा करत आहेत. पण एकदा का ही सिल्क साडी (silk saree) घेतली की, तिची काळजी घेणे देखील तितकेचं महत्वाचे आहे. कारण जर आपण या सिल्कच्या साडी काळजी घेतली नाही तर ती साडी लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे इतक्या महागाची साडी खराब झाली तर आपल्या कपड्यांसोबत पैसाही वाया जाऊ शकतो.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सिल्कच्या साड्यांना जास्त काळ निट-नेटके कसे ठेवायचे याच्या काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही त्रासाशिवाय हवी तेव्हा साडी नेसता येईल.

Silk saree
पायात साधी स्लीपर, संथाली साडी घालून द्रौपदी मुर्मूंनी घेतली शपथ

1) सिल्कच्या साड्या नेहमी मलमलच्या कपड्यात ठेवाव्या. सिल्कच्या साड्या नेहमी मलमल किंवा सुती कापडात गुंडाळून ठेवाव्यात. पावसाळ्यात ओलाव्याचा वास येऊ नये, यासाठी दर पंधरा दिवसानंतर साड्या सूर्यप्रकाशात टाकल्या पाहिजेत. पण साड्या सुर्यप्रकाशात टाकतांना थेट सूर्यप्रकाश न घेण्याचा प्रयत्न करा. वरुन कुंडीचे किंवा इतर पाण्यांचे थेंब पडतील अशा ठिकाणी साडी वाळू घालू नका. सिल्कची साडी कधीच ओली असतांना उन्हात वाळू घालू नका. नाहीतर तो पाण्याचा डाग साडीवर तसाच टिकून राहू शकतो.

2) कधी चुकून सिल्क साडीवर कशाचा डाग पडला तर तो कसा काढायचा ?

सिल्क साडीवरील डाग घालवण्यासाठी पेट्रोलचा वापर करणे योग्य ठरेल. ज्यूस, आइस्क्रीम, चहाचे डाग सौम्य डिटर्जंट आणि प्रोटीन डाग रिमूव्हरने सहज काढले जातात. ते थोडे कापसात घेऊन डागावर हलक्या हाताने घासून तुम्ही तो डाग काढू शकता. सिल्कच्या साडीवर ब्रश वापरणे टाळा, कारण त्यामुळे साडी फाटू शकते.

3) सिल्कच्या साडीचे आर्द्रतेपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. किडे, धूळ, ओलावा यापासून रेशीमचे संरक्षण करण्यासाठी ते तपकिरी कागद किंवा पांढर्‍या सुती कापडात गुंडाळून ठेवू शकता. चुकूनही सिल्कची साडी प्लॅस्टिक कव्हर किंवा पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ठेवू नका. तसेच या साड्या कधीही लोखंडी किंवा लाकडी हँगर्सवर लटकवू ठेवू नका. या सिल्कच्या साड्यांना स्वच्छ कागदात गुंडाळून ठेवणे हा एक उत्तम पर्याय करु शकतो.

4) साडी प्रेस करतांना विशेष काळजी घ्या. अनेकदा आपण सगळे कपडे सारखेच समजून दाबण्याची चूक करतो, पण सिल्कच्या साड्यांसोबत असे अजिबात करू नका. जर तुम्हाला सिल्क साडीला इस्त्री करायची असेल तर सिल्क साडीखाली सुती कापड ठेवा. आणि पुढच्या वेळी दुसर्‍या पार्टीत जाण्यासाठी, सिल्कवर प्रेसचे तापमान सेट करा आणि फोल्ड्स काढण्यासाठी दाबा आणि नेहमी साडी उलटी दाबा. यामुळे साडी जळण्याचा किंवा खराब होण्याचा धोका कमी होतो.

Silk saree
ब्लाउजऐवजी कुर्ती, टॉप अन् जॅकेटवर नेसा साडी! राहा स्टायलिश

5) चुकूनही सिल्कच्या साडीवर पाणी शिंपडू नका. सिल्कच्या साड्यांवर फोल्डच्या खुणा लवकर तयार होतात. अशा परिस्थितीत, वेळोवेळी, त्यांना उलटा करा. या इतर कापडाच्या साड्यांसोबत ठेवू नका. त्यांना बटर पेपरवर अलगद गुंडाळा. थेट सूर्यप्रकाशात साडी वाळवू नका, वर मलमल किंवा हलका सुती दुपट्टा घाला. इस्त्री करताना पाणी शिंपडू नका. रेशमी साड्या नेहमी थंड आणि गडद ठिकाणी ठेवा.

6) सिल्कच्या साडीकरता ड्रायक्लीन हा योग्य पर्याय आहे. रेशमी साड्या स्वच्छ करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ड्राय क्लीनिंग. साडी धुवायची गरज भासल्यास एक बादली पाण्यात क्वार्टर कप डिस्टिल्ड वॉटर, व्हाईट व्हिनेगर आणि शॅम्पू टाकून हलक्या हातांनी धुवा. जर तुमच्या घरात कडक पाण्याचा पुरवठा होत असेल तर सिल्कच्या साडीवर सौम्य डिटर्जंट वापरा.

7) सिल्कची साडी जर का खूप महाग असली तर तुम्ही तिच्या पदराच्या खाली नरम नेट लावू शकता, त्यामुळे साडीवरील जरीची डिजाईन खराब होत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com