Monsoon Travelling Tips : या टिप्स वाचा मगच पावसाळ्यात ट्रिपला जा!, पुन्हा म्हणू नका आधी सांगितलं नाही?

पावसाळी ट्रिप गंडायला नको असेल तर हे वाचाच!
Monsoon Travelling Tips
Monsoon Travelling Tips esakal

Monsoon Travelling Tips :  प्रत्येकाच्या आठवणीतला, प्रत्येकाच्या मनातला प्रत्येकालाच वेगळा भासणारा, प्रत्येकाच्या हृदयात प्रेमाची अबोल भावना निर्माण करणारा 'पाऊस' तो कधी गाण्यात तर कधी कोणाला कटू आठवणीत भेटतो आणि प्रत्येकालाच चिंब भिजवून जातो.

चार महिने सोबत राहून वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा देऊन पुढच्या वर्षी परत येण्याचं वचन देऊन सारी सृष्टी समृद्ध करून तो परत जातो. तरुणाईच्या मनात हिरवळ पसरवून जातोपाऊस आणि तरुणाईचे नाते आगळेवेगळे असते.

बोरिंग लेक्चर चालू असताना अचानक त्याची एन्ट्री होते आणि सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधले जाते. कधी एकदा लेक्चर संपतंय आणि आपण बाहेर जाऊन पावसात मनसोक्त भिजतोय असं वाटतं. मित्रांसोबत पावसाळी सहलीचे प्लॅनिंग सुरू झालं आहे.

Monsoon Travelling Tips
Monsoon : खूशखबर! 23 जूनपासून संपूर्ण भारतात पावसाची हजेरी; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

मित्र-मैत्रिणीसोबत पावसात भिजत केलेली बाईक राईड, सेल्फी, ग्रुपी, आणि स्वतःचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले जातात.

पावसाळ्यात दोन प्रकारचे लोक असतात, एक ज्यांना घरी बसून चहाचे पकोडे खायला आवडतात आणि दुसरे ज्यांना पावसात बाहेर जाऊन निसर्गाचा आस्वाद घ्यायला आवडतो.

जर तुम्हीही दुसऱ्या वर्गातील व्यक्ती असाल तर पावसाळ्यातही तुम्ही ट्रॅव्हल प्लॅन करत असाल. चला तर मग तुम्हाला या सीझनमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात कशी करावी आणि प्रवासाचा पुरेपूर आनंद कसा घ्यावा, अशा काही टिप्स आज आपण पाहुयात.

Monsoon Travelling Tips
Monsoon Season : पावसाचा अद्याप पत्ताच नाही; 'पेरणी'बाबत कृषी विभागानं दिली महत्वाची अपडेट
 • सिंथेटिक कपडे सोबत ठेवायला विसरू नका. छत्री आणि रेनकोट व्यतिरिक्त असे काही कपडे घ्या जे पाणी शोषून घेणारे नसतील. सिंथेटिक कपडे लवकर वाळतात आणि त्रास सहन करावा लागत नाही.

 • प्रवासादरम्यान स्ट्रीट फूड खाणे टाळा. या ऋतूत जिवाणू आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका जास्त असतो. आजारी पडू नये म्हणून गाड्या वगैरेतून काहीही खाणे टाळावे.

 • आपण सोडत असलेल्या ठिकाणाचा हवामान अहवाल आणि बातम्या पाहण्यास विसरू नका. आपण निघत असलेल्या दिवसाच्या 2-3 दिवसांची संपूर्ण माहिती ठेवा जेणेकरून आपल्याला तेथे पोहोचण्यास त्रास होणार नाही.

 • सर्वात प्रथम तुम्ही जिथे फिरायला जाणार आहात तेथील सर्व माहिती घ्या.जसे की तेथे पर्यटन सध्या सुरू आहे का?तेथे जाण्यासाठी कोणता मार्ग आहे,तुम्ही राहत असलेल्या ठिकाणापासून तेथे पोहचण्यासाठी किती वेळ लागणार आहे? सध्या त्याठिकाणी पावसाची काय स्थिती आहे? एखाद्या ठिकाणी जर जास्त पाऊस पडत असेल तर शक्यतो जाणे टाळलेले बरे.

 • केसांसाठी योग्य शाम्पू, हेअर ड्रायर सोबत ठेवा. हेअर ड्रायरमुळे तुमचे कपडे, केस आणि गोष्टी कोरड्या होण्यास मदत होईल.  

 • टाइमपासच्या काही गोष्टी जसे की बोर्ड गेम्स किंवा एखादे पुस्तक सोबत ठेवा. कारण पावसाळ्यात सगळीकडे चांगले जाळे नसते.

 • इंटरनेट काम करत नसताना कंटाळा येऊ नये म्हणून ऑफलाइनही गाणी डाऊनलोड करा. चप्पल आणि सॅंडलपेक्षा शूज घेऊन जाणे चांगले. पावसात रबरी शूज घालायलाही चांगले असतात.

Monsoon Travelling Tips
Monsoon Season : पावसाचा अद्याप पत्ताच नाही; 'पेरणी'बाबत कृषी विभागानं दिली महत्वाची अपडेट
 • आवश्यक औषधे आणि पट्टी असलेला एक छोटा प्रथमोपचार पेटी ठेवा. तसेच कीटक व डासांसाठी क्रीम वगैरे घेऊन जावे. पावसाळ्यात वीज कधी निघते आणि मग तासन्तास येत नाही हे कळत नाही, त्यामुळे पॉवर बँक सोबत ठेवा.

 • आपल्या टूलकिटमध्ये कात्री, टेप, दोरी आणि स्क्रूड्रायव्हर इत्यादी घेऊन जा. आपल्याला कधी एखाद्या गोष्टीची आवश्यकता असेल माहित आहे का?

 • पावसाळी शूटसाठी कॅमेरा सोबत घेणार असाल तर त्यासाठी प्रोटेक्टीव्ह बॅग सोबत ठेवा. धबधब्याच्या ठिकाणी गेल्यावर मोबाईल भिजू नये यासाठी कव्हर ठेवा.

 • या ऋतुमध्ये अनेक ठिकाणी नदी, नाले भरून वाहतात, अनेक ठिकाणी चिखल झाल्याने डास मोठ्या प्रमाणात होतात. डासांमुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे डासांपासून संरक्षण होणारे क्रीम सोबत ठेवावे. तसेच शक्य असल्यास मच्छरदाणी सोबत ठेवावी.

 • प्रवासाला जाताना शक्यतो कमीत- कमी आणि गरजेचे सामानच सोबत ठेवावे.जास्त वजन सोबत घेऊ नये. कारण जितके जास्त सामान सोबत असेल तितके ते संभाळावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com