esakal | स्किन टोन सुधारायचाय? जाणून घ्या 'या' महत्वाची टिप्स ; Face Pack
sakal

बोलून बातमी शोधा

 पॅक

स्किन टोन सुधाराचाय? जाणून घ्या 'या' महत्वाची टिप्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

भारतात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात जेवणात डाळीचा वापर केला जातो. डाळीची आमटी, वरण हे नियमित जेवणात वापरले जाते. डाळीत प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. लहान मुलांना याचे वरण दिले जाते. विदर्भ साइटला रोजच्या जेवणात एक वाटी डाळ खाल्ली जातेच. मूग डाळ ही आरोग्यवर्धक असते. यात पेक्टिन नावाचे फायबर असते. ज्यामुळे पचनप्रक्रिया निरोगी राहण्यास मदत करते. शिवाय निरोगी बॅक्टेरियांची वाढ होण्यास मदत होते. एवढेच नाही तर मूग (Moong Dal) डाळीपासून मिठाई बनवली जाते. याचा वापर स्किन टोन सुधारण्यासाठी होतो. याचा पॅक जर तुम्ही वापरलात तर स्किन टोन (Skin tone) सुधारण्यास मदत होते.

डेड स्किन घालवते

ऊन, वारा यामुळे आपली स्किन डेड होते. प्रत्येकवेळी पार्लरला जाणे शक्य होत नाही. अशावेळी घरीच तुम्ही मुग डाळीचा फेस पॅक बनवून वापरू शकता. यामुळे सेल्स स्वच्छ होतातच शिवाय स्किन ग्लो होण्यास मदत होते. याचबरोबर सेल्सची लाईफ वाढवण्यास मदत होते.

स्किन टोन चांगला होतो

तुम्ही जेव्हा पहिल्यांदा हा पॅक लावाल त्यावेळी तुम्हाला फरक जाणवेल.

असा बनवा मूग डाळीचा फेस पॅक

रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे मूग डाळ दुधात भिजवून फ्रिजमध्ये ठेवून द्या. सकाळी भिजवलेल्या या डाळीची पेस्ट करून घ्या. यात अर्धा चमचा हळद पावडर मिक्स करून घ्या. यात एक चमचा तांदळाचे पीठ घालून मिक्स करून घ्या.

असा करा वापर

हा फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा धुऊन घ्या. या पॅकला चेहरा आणि मानेला स्क्रब लावतो या पध्दतीने लावून घ्या. कमीतकमी २० मिनिटे हा पॅक लावून ठेवा. त्यावर गुलाब पाण्याचा स्प्रे मारा किंवा दुधाचा शिंतोडा मारत राहा. २० मिनिटानंतर फेसपॅक धुऊन टाका. चेहरा पुसून मॉइश्चराइजर लावा.

loading image
go to top