
स्मिता शेवाळे
एके दिवशी मी पहाटे उठून किचनमध्ये गेले, तर आजी डायनिंग टेबलवर चहाचा कप ठेवून खिडकीतून बाहेर बघत बसल्या होत्या. एकीकडे रेडिओवरच्या बातम्या संपून भक्तिगीतं सुरू झाली होती. खिडकीतून दिसणारं अशोकाचं झाड, समोर भुरभुरणारा पाऊस आणि तिकडे एकटक बघत बसलेल्या आजी. हे दृश्य माझ्यासाठी नवीन होतं - कारण आमच्या बोरीवलीच्या आजींकडे मी इतक्यातच पेइंग गेस्ट म्हणून राहायला लागले होते. माझा त्यांच्याशी फारसा परिचय नसल्यामुळे काहीही न बोलता मी त्यांच्या शांततेचा भंग होऊ दिला नाही आणि माझी आवराआवर सुरू केली. ते दृश्य मात्र माझ्या डोळ्यांमध्ये बंदिस्त झालं होतं.