Mosquitoes : डासांची भूणभूण, पण त्यालाही किती पडतात कष्ट! सेकंदाला कितीवेळा हलवतात पंख माहितीये? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mosquitoes

Mosquitoes : डासांची भूणभूण, पण त्यालाही किती पडतात कष्ट! सेकंदाला कितीवेळा हलवतात पंख माहितीये?

Mosquito Singing : असं म्हणातता अशी एक जागा सापडणार नाही जिथे डास नसतात. सतत कानाशी भूणभूण करणारे हे डास घर, ऑफिस, बाहेर जवळपास प्रत्येकच ठिकाणी आपलं संगीत लावून फिरतच असतात. तुम्हालाही कधी ना कधी हे अनुभवायला आलं असेलच.

डास कानाजवळच का भूणभूणतात?

टक शास्त्रज्ञांच्या मते, डास शरीराच्या त्या भागाकडे जास्त आकर्षित होतात ज्यांना जास्त वास येतो. त्यामुळे कानाच्या जवळ डास जास्त भूणभूणतात.

हेही वाचा: Mosquito Protection Tips : एक डास चावल्याने ‘त्याची’ 30 ऑपरेशनसह पायाची बोटे कापावी लागली

याव्यतिरिक्त, आपल्या शरीरातील उष्णता आणि घाम डास आपल्याजवळ येण्यास प्रवृत्त करतात, तसंच झोपेच्या वेळी आपण श्वासामार्गे सोडलेला कार्बनडाय ऑक्साईड यामुळे डास डोक्यावर फिरू लागतात.

हेही वाचा: Mosquitoes Protection : डासांपासून तुमचं संरक्षण करेल अवघ्या दहा रुपयांचा हा उपाय

एका सेकंदात कितीवेळा पंख हलवतात?

संशोधकांच्या मते, जेव्हा आपण झोपतो डास अचानक येऊन आपल्या कानाजवळ फिरतात आणि सतत भूणभूणतात. पण हा येणारा आवाज डास करत नसून त्यांच्या पंखाच्या तीव्र वेगामुळे येतो. तज्ञांच्या मते, एक डास प्रति सेकंद २५० वेळा पंख फडफडू शकतो, तर डास एकमेकांशी संवाद साधण्यासाठी अशाप्रकारेच आवाज काढतात.

टॅग्स :MosquitoMosquitoes