Mosquito Problem: धक्कादायक! कूलर लावू नका नाहीतर डासांची पार्टी सुरु होईल तुमच्या घरात...

डासांबद्दल एक सत्य हे आहे की ते खूप उंच उडत नाहीत पण याचा अर्थ असा नाही की त्यांना वरप पर्यंत उडता येत नाही
Mosquito Problem
Mosquito Problemesakal
Updated on

Mosquito Problem : गरमी म्हटली की सगळेच घरात कूलर लावतात. कारण नुसत्या पंख्याने काहीही होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे. उन्हाळ्यात गरमी सोबत आणखीन एक त्रास होतो आणि तो म्हणजे डास. पण जर तुम्ही घरात कूलर लावत असाल तर तुम्हाला याच डासांचा धोका आहे. कारण अगदी एव्हढस पाणी सुद्धा डासांना प्रजनन करण्यासाठी भरपूर असतं.

अशात जर तुम्हाला वाटत असेल की ठिके आम्ही तळ मजल्यावर राहत नाही आणि डास वर पर्यंत येऊ शकणार नाही तर हा तुमचा गैरसमज आहे. डास नक्की किती उंच उडू शकतात माहिती आहे? चला आज याबद्दल जाणून घेऊया.

डास किती उंच उडू शकतात? यावर अनेक गृहीतके आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की विशिष्ट उंचीनंतर डास उडू शकत नाहीत, म्हणून ते उंच इमारतींमध्ये वरच्या मजल्याच घर घेणं पसंत करतात. तर काहींना वाटत की उलट वरती डास जास्त चावतात.

बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की डास जमिनीपासून फक्त 25 फूट उंचीवर उडू शकतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि ही वस्तुस्थिती जाणून अनेकांना धक्का बसेल.

Mosquito Problem
Mosquito Protection Tips : एक डास चावल्याने ‘त्याची’ 30 ऑपरेशनसह पायाची बोटे कापावी लागली

डासांबद्दल एक सत्य हे आहे की ते खूप उंच उडत नाहीत पण याचा अर्थ असा नाही की त्यांना वरप पर्यंत उडता येत नाही. काही प्रजाती 40 फूट उंचीपर्यंत झाडांवर त्यांचे घर बांधतात, तर काही इमारतीच्या 20 मजल्यांवर सहजपणे poपोहोचतात. यात खरं हे आहे की अगदी एक इंच तळ्यात पाणी साठवून ते कितीही उंचावर ठेवले तरी त्यात डासांची उत्पत्ती होऊ शकते.

याबाबत शास्त्रज्ञांचा असा तर्क आहे की त्यांना हिमालयापर्यंत म्हणजेच समुद्र सपाटी पासून 8 हजारांपेक्षा जास्त उंचीपर्यंत डासांच्या प्रजाती आणि अधिवास सापडला आहे.

उंचावर असलेल्या जोरदार वाऱ्यातही डास आढळून आले आहेत. म्हणजे डास कुठेही असू शकतात. पण हे देखील खरे आहे की बहुतेक डासांच्या प्रजाती कमी उंचीच्या ठिकाणी राहणे पसंत करतात.

Mosquito Problem
Home Remedies For Mosquitos  : घरातून डासांची हाकालपट्टी करण्याचे देसी जुगाड; चौथ्या नंबरला आहे जालिम उपाय!

उंचीवर कमी ऑक्सिजनमुळे, डास तिथे फिरत नाहीत; कमी तापमानामुळे तिथे डासांची उत्पत्ती होत नाही. हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात डासांची उत्पत्ती अधिक होत असल्याचेही दिसून आले आहे.

सॉल्टमार्श डासांच्या प्रजाती त्यांच्या प्रजनन क्षेत्रापासून सुमारे 32 ते 64 किलोमीटरचा प्रवास करतात आणि प्रजननासाठी अनुकूल जागेच्या शोधात फिरत असतात. त्यांची गती डासांच्या प्रजाती आणि त्यांचे लिंग यावर अवलंबून असते. त्यांचा सामान्य वेग ताशी एक ते दीड मैल इतकाच असतो.

Mosquito Problem
Tips For Mosquitoes : डासाने वैतागला आहात? गुड नाइट नाही तर किचनमधले हे पदार्थ आहेत जास्त विषारी...

उंच मजल्यावर राहिल्याने डासांपासून काही प्रमाणात आराम मिळतो, असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते बरोबर नाही. तुमचा मजला त्यांच्यासाठी किती सुसंगत आहे यावर बरेच काही अवलंबून आहे. तुमच्या घरात भांडी असतील किंवा कूलरमध्ये बराच वेळ पाणी भरले असेल तर ते सहज तुमच्या घरात येऊ शकतात आणि तिथे प्रजनना द्वारे वाढूही शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com