Home Remedies For Mosquitos  : घरातून डासांची हाकालपट्टी करण्याचे देसी जुगाड; चौथ्या नंबरला आहे जालिम उपाय!

डासांना पळवायचा सोप्पा उपाय!
Home Remedies For Mosquitos
Home Remedies For Mosquitosesakal

Home Remedies For Mosquitos :उन्हाळा सुरू झालाय आणि अचानकच घरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याला जबाबदार आपणच आहोत. कचऱ्याचे ढिग, सार्वजनिक अस्वच्छतेमुळे डासांची उत्त्पती वाढू लागली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया  यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही  वाढले आहे.

मग डासांना दूर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली केमिकलयुक्त उत्पादनांचा परिणाम उलटा आपल्याच आरोग्यावर होतो. 

डासांना पळवायचा सोपा उपाय म्हणून मॉर्टीन लिक्विडकडे पाहिले जाते. ते ऑन केल की डास जातात. पण जेव्हा ते नॉर्मल मोडला येते तेव्हा डास आपल्याला फोडून काढतात. त्यावेळी या लिक्विडचाही काही उपयोग नाही असे वाटते.

Home Remedies For Mosquitos
Mosquito Terminator Train : आता IRCTC ने सुरू केली डासांसाठीही स्पेशल ट्रेन

त्रास देणाऱ्या डासांना पळवून लावायला काही देशी जुगाड करणं कधीही फायद्याचं ठरतं पण, ते कोणते उपाय आहेत हे माहिती नसल्याने लोक ते करत नाहीत. आज आपण त्याबद्दल जाणून घेऊयात.

Home Remedies For Mosquitos
Mosquitos in Jail : कोठडीत होतोय त्रास! दाऊदच्या सहकाऱ्याची बाटलीत मच्छर घेऊन थेट कोर्टात धाव

कडूलिंब

डासांना पळवून लावण्यासाठी कडूलिंब फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा. याचा परिणाम ८ तास राहतो. लिंबाचे आणि निलगिरीचे तेल सम प्रमाणात मिक्स करुन शरीरावर लावा. त्यामुळे मच्छर तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत.

तुम्ही घरात कडुलिंबाचा ओला पालाही जाळू शकता. त्या कडवट धुरामुळे डास घरातून कायमचे निघून जातात.

Home Remedies For Mosquitos
Mosquito Protection Tips : एक डास चावल्याने ‘त्याची’ 30 ऑपरेशनसह पायाची बोटे कापावी लागली

घरात कापूर जाळा

डासांसाठी कॉईल जाळली तर त्याच्या वासाने अनेकांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही घरात कॉईल ऐवजी कापूर जाळा. मोठ्या प्रमाणावर १५-२० मिनिटे त्याचा धूर होऊ द्या. यामुळे डासांचा डास घरातून पळून जातील.

थंड तेल

तुम्ही गार्डनमध्ये जाणार असाल. वा घरात अचानक जास्त डास आले. तर तुम्ही कोणतंही थंड तेल तुमच्या शरीरावर लावू शकता. त्यामुळे डासांपासून तुमचा बचाव होईल.

डासांना पळवायला मदत करेल कडुलिंब
डासांना पळवायला मदत करेल कडुलिंबesakal
Home Remedies For Mosquitos
Mosquito Repellent Plants : 'ही' पाच झाडं लावाल तर घरातून झटक्यात पळतील डास

लेमनग्रास

लेमनग्रासची काही पाने घेऊन त्यात नारळाचे तेल आणि लवंगा घालून शिजवा. आता हे तेल अंगावर लावा. असे केल्याने केवळ डास तुमच्या जवळ येणार नाहीत.

हे तेल तुमच्या त्वचेसाठीही चांगलं आहे आणि त्वचेच्या अनेक प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून बचाव करण्यास मदत करते. त्यामुळे डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

Home Remedies For Mosquitos
Mosquito Control Tips : अगरबत्ती, मॉर्टीननेही डास कमी होईनात? ; हा स्वस्त न् मस्त उपाय करेल मदत!

लसूण

लसणाच्या वासाने डास आजूबाजूलाही फिरकत नाहीत. त्यामुळे लसूण किसून पाण्यात उकळवा आणि रुममध्ये ठेवा. डास दूर पळतील. तसेच, लव्हेंडरचा सुगंध खूप तेज असतो आणि डास तिथे फिरकत नाहीत. म्हणून घरात लव्हेंडर युक्त रुम फ्रेशनर वापरा.  

नारळाचे तेल, लवंगाचे तेल, निलगिरीचे तेल, तुळशीच्या पानांचा रस, कडुलिंबाचे तेल, पुदीनाची पाने किंवा लसूणचा रस घरात शिंपडल्यास. मग त्याच्या  वासाने डास घरातून पळून जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com