मातृत्व आणि भावनिक आरोग्य

तथापि, तणाव आणि चिंता यांसारख्या भावना तुमच्या शरीरातील विशिष्ट हार्मोन्स वाढवू शकतात, ज्यामुळे तुमच्या बाळाच्या विकसनशील शरीरावर आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो.
Motherhood and Emotional Health Baby developing communication
Motherhood and Emotional Health Baby developing communicationSakal

- डॉ. मलिहा साबळे

जेव्हा तुम्हाला आनंदी आणि शांत वाटते, तेव्हाच तुमचे बाळ आनंदी, शांत वातावरणात विकसित होऊ शकते. तथापि, तणाव आणि चिंता यांसारख्या भावना तुमच्या शरीरातील विशिष्ट हार्मोन्स वाढवू शकतात, ज्यामुळे तुमच्या बाळाच्या विकसनशील शरीरावर आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो.

जन्मापासून, तुमचा तुमच्या बाळासोबतचा संवाद, तो किंवा ती पुढील आयुष्यात कसा विचार करेल, अनुभवेल आणि वागेल या गोष्टींना आकार देण्यास मदत करतो. हा परस्परसंवाद तुम्ही आणि तुमचे मूल यांच्यात महत्त्वाचे भावनिक बंध निर्माण करण्यास मदत करतो. चांगले भावनिक आरोग्य तुमच्या मोठ्या मुलांशी आणि इतर कुटुंबाशी सकारात्मक नातेसंबंध टिकवून ठेवण्यासही मदत करते. ते तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला नवीन बाळाशी जुळवून घेण्याच्या आव्हानांमध्ये मदत करू शकते.

भावनांशी संघर्ष

बऱ्याचदा एक किंवा दोन्ही पालकांना गर्भधारणेदरम्यान किंवा मुलाच्या जन्मानंतर मानसिक समस्या जाणवतात. तुम्ही एकटे नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. अधूनमधून नकारात्मक विचार, स्वप्ने किंवा क्षणभंगुर शंका येणे सर्वसाधारण आहे.

बऱ्याच चिंता तुम्हालाजाणवू शकतात :

  • बाळाच्या जन्माची चिंता

  • झोपेचा अभाव

  • पालक म्हणून तुम्ही कसा सामना करत आहात याची चिंता.

कधीकधी मातृत्वाच्या आनंदी भावनांमध्ये नुकसान, भीती, चिंता, अपराधीपणा आणि निराशा या भावना मिसळल्या जातात. माझ्याकडून खूप चुका झाल्या तर?, लोक मला वाईट आई समजतील का?, माझ्या जुन्या आयुष्याचे काय?... असे प्रश्न मनात येऊ शकतात.

जेव्हा तुम्ही बाळाच्या जन्मासारख्या मोठ्या जीवनातील बदलातून जात असाल तेव्हा तुम्हाला असे प्रश्न पडणे सर्वसामान्य आहे.

तुमच्या जोडीदारासोबतच्या नातेसंबंधातही खूप बदल होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. बाळ होण्याआधीच्या आणि नंतरच्या काळात गोंधळलेले, तणावग्रस्त आणि तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर असणे स्वाभाविक आहे. फक्त लक्षात ठेवा - या काळात तुम्ही स्वतःला आणि तुमच्या जोडीदाराला आधार देण्यासाठी अनेक गोष्टी करू शकता. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे, वेळोवेळी एकमेकांना विश्रांतीसाठी वेळ आणि स्वत:ला बरे करण्यास मदत करत राहणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com