

शरयू सोनावणे
आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण, तिनं नऊ महिने मला पोटात वाढवलं आहे. तिच्यामुळे मी या जगात येऊ शकले. तिनंच मला हे जग दाखवलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी कितीही माया केली, कितीही प्रेम केलं तरी आईची उणीव कोणीच भरून काढू शकत नाही. कारण, आई ही आईच असते. तिची जागा दुसरं कोणीच आणि कधीच घेऊ शकत नाही. आई ही माझी हक्काची जागा आहे.