Mothers Day 2024 : तब्बल एक हजारांहून अधिक मातांकडून 'दूध दान'; काय खासियत आहे मिल्क बॅंकेची?

प्रसूतीनंतर जोवर माता रुग्णालयामध्ये असतात, तोवर स्वंयस्फूर्तीने त्या दूध दान करतात.
KLE Hospital Dr. Prabhakar Kore Milk Donation
KLE Hospital Dr. Prabhakar Kore Milk Donationesakal
Summary

आईच्या दुधाचे दान करणे ही पवित्र बाब आहे, त्याबाबत समाजात जागृती होणे आवश्‍यक आहे. केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाकडून याबाबत सातत्याने जागृती केली जात आहे.

Mother's Day : नवजात बालकांसाठी ‘अमृत’ समजल्या जाणाऱ्या आईच्या दुधासाठी (Mother's Milk) सुरू करण्यात आलेल्या मिल्क बॅंकेला मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. दरवर्षी १ हजारहून अधिक माता दूध दान करीत असल्याची माहिती येथील केएलईएस (KLE Hospital) डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयामधून मिळाली आहे. २०१८ साली मिल्क बॅंक सुरू झाली, त्यावेळी मिळणारा मातांचा प्रतिसाद खूपच कमी होता. मात्र, आता तो मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आजवर एकदाही या मिल्क बॅंकेला (Milk Banks) दुधाची कमतरता भासलेली नाही.

काही मुले (Newborn Baby) जन्मतःच कमकुवत असतात, त्यामुळे त्यांना एनआयसीयूमध्ये ठेवावे लागते. अशा मुलांसाठी तर मिल्क बॅंकेतील दूध जीवदायिनी ठरते. त्यामुळे मातांनाही आता या मिल्क बॅंकेचे महत्व पटू लागले आहे. प्रसूतीनंतर जोवर माता रुग्णालयामध्ये असतात, तोवर स्वंयस्फूर्तीने त्या दूध दान करतात. त्यानंतर लसीकरणासाठी रुग्णालयामध्ये गेल्यावरही काही माता स्वयंस्‍फूर्तीने दूध दान करतात. त्यामुळेच मिल्क बॅंकेत मागणीइतके दूध उपलब्ध असते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे दूध सहा महिने टिकविता येते.

KLE Hospital Dr. Prabhakar Kore Milk Donation
Mothers Day 2024 : एकट्याच राहणाऱ्या आईला या गोष्टींत रमायला शिकवा, तिचा वेळ चांगला जाईल!

रक्तदान, देहदान, अवयवदान ही चळवळ समाजात रूजत असली तरी अद्याप समाजातील सर्व घटकांनी ही संकल्पना स्वीकारलेली नाही. त्यामुळे यासाठी आजही जागृती मोहीम राबविली जाते. आईच्या दुधाचे दान करण्याबाबतही गैरसमज होते, त्यामुळे प्रारंभी दूध दान करणाऱ्या मातांची संख्या खूपच कमी होती. केएलईएस रुग्णालयाच्या प्रसूती विभागात याबाबत वारंवार जागृती करण्यात आली. आईच्या दुधाचे महत्त्‍व, नवजात बालकांना ते दूध दिल्यामुळे होणारे फायदे याची माहिती दिल्यानंतर मातांनी दूध दान करण्यास सुरुवात केली. प्रसुतीनंतर एकदा नव्हे, तर अनेकदा मातांकडून दूध दान केले जाते, अशी माहिती अमृत मिल्क बॅंकेतून देण्यात आली.

KLE Hospital Dr. Prabhakar Kore Milk Donation
Mother's Day 2024 : यंदाच्या जागतिक मातृदिनी आईला द्या आकर्षक भेटवस्तू, जाणून घ्या 'हे' भन्नाट ऑप्शन्स

या मिल्क बॅंकेतील दूध केएलईएस रुग्णालयामध्येच जन्मलेल्या नवजात बालकांना गरजेनुसार दिले जाते. बाहेरील काही रुग्णालयांकडूनही दुधाची मागणी होते. त्यांची गरज लक्षात घेवून त्यांना दूध दिले जाते. उत्तर कर्नाटकातील पहिली मिल्क बॅंक केएलईएस रुग्णालयामध्ये सुरू झाली. या मिल्क बॅंकेच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही वर्षात राज्यातील आणखी काही रुग्णालयामध्येही मिल्क बॅंक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता ही संकल्पना समाजात रूजू लागली आहे. एनआयसीयूमध्ये असलेल्या बालकांना थेट आईचे दूध देण्याऐवजी मिल्क बॅंकेतील दूध दिले तर संसर्ग होत नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. म्हणूनही मिल्क बॅंकेतील दुधाला मागणी आहे. अमृत मिल्क बॅंकेचा लाभ आजवर सुमारे नऊ हजार बालकांना झाला आहे.

KLE Hospital Dr. Prabhakar Kore Milk Donation
Mothers Day 2024 : मदर्स डेची सुरूवात जिने केली तिलाच तो बंदही करायचा होता? कारण...

आईच्या दुधाचे दान करणे ही पवित्र बाब आहे, त्याबाबत समाजात जागृती होणे आवश्‍यक आहे. केएलईएस डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाकडून याबाबत सातत्याने जागृती केली जात आहे. अमृत मिल्क बॅंकेत दूध दान करणाऱ्यांना पैसे दिले जात नाहीत, शिवाय दूध पुरवठा करण्यासाठी बॅंकेकडून पैसे आकारले जात नाहीत. दूध दान करण्याच्या माध्यमातून पैसे कमावणे चुकीचे आहे. एक सत्कार्य म्हणून महिलांनी यासाठी पुढे यायला हवे.

-डॉ. रूपा बेल्लद, प्रमुख, अमृत मिल्क बॅंक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com