Mother's Day Blog : तरुणपणी ती मुलांसाठी झटते पण उतरत्या वयात तिचं काय? कोण घेतं तिची जबाबदारी...

तिला वृद्धत्व आले की तिचे काय? कोण घेतं तिची जबाबदारी. नवरा बायको दोघे असले तर कसेबसे एकमेकांना सांभाळून घेतात.
Mother’s Day
Mother’s DaySakal

Mother's Day Blog : आईची लेकरांसाठी असणारी करूण माया, जी तिच्याकडून कधीच संपत नसते. ती मुलांना जन्म देण्याआधी सुखी संसारासाठी झटत असते आणि मुलं जन्माला आली की कुटुंबाचा सांभाळ करत मुलांसाठी झटत असते. मात्र तिला वृद्धत्व आले की तिचे काय? कोण घेतं तिची जबाबदारी. नवरा बायको दोघे असले तर कसेबसे एकमेकांना सांभाळून घेतात.

मात्र मी विचार करत होते अशा आईचा जिने तिचा साथीदारच तरुणपणी गमावला होता आणि तारूण्य मुलांच्या उज्वल भविष्यासाठी कष्टात काढले होते. मुलांचे लग्न होतपर्यंत मुलांचे कामावर जायचे डबे असतात म्हणून एक दिवसाची कधी ती बाहेरगावीसुद्धा गेली नव्हती. इतरांपेक्षा तिने तिच्या मुलांना जास्त महत्व दिलं होतं. स्वत: कधी नवी साडी घेतली नाही पण मुलांच्या उज्वल भविष्यासाठी ती पैसे जमवत होती.

कधीतरी मोठ्यांच्याच तोंडून ऐकलं असावं ते तिच्या बाबतीत खरं होताना मी जवळून पाहिलं. मोठे, वयोवृद्ध म्हणायचे एखाद्याच्या वाटेचं दु:ख असं असतं की ते मरेपर्यंत त्याला पुरतं. आता हे तिच्याबाबतीत खरं झालं असंच म्हणावं लागेल. म्हणायला ती माझी मोठी मावशी आहे. पण मी तिला मावशीपेक्षा जास्त जवळचं समजून घेतलं होतं. तिचं दु:ख जवळून बघितलं असल्याने मला कायम तिच्याबद्दल वाईट वाटतं. का एका एकट्या वृद्ध स्त्रिच्या वाट्याला असे दुखणे यावे असंही वाटतं.

Mother’s Day
Mother’s Day 2023: 'सुपर मॉम'! या आहेत सुपर 7 मदर इंडिया... सर्वांचीच कहानी आहे प्रेरणादायी

माझे वय सध्या २३. मात्र माझ्या आईच्या संस्कारांचा माझ्यावर लहानपणापासूनच इतका प्रभाव होता की इतरांचं दु:ख जसं तिला बघवत नाही तसं मलाही बघवत नाही. जिथे चुकीचं घडतं तिथे मी समजून काढायला पुढेच असते.

माझ्या मावशीच्या मुलांसाठी तिने घेतलेले कष्ट म्हणजे मला खरा संघर्ष वाटे. मात्र तिच्या मुलांच्या लग्नानंतर तिच्या वाटेला असा संघर्ष येईल असा विचार आम्ही नातेवाईकांनी कधीच केला नव्हता. होय, तिच्या मुलांचे लग्न झाले आणि तिला तिच्याच हक्काच्या घरी राहाणे मुश्कील झाले. ज्या मुलांना तिने रक्ताचं पाणी करून शिकवलं ते तिनेच कष्टाने कमावलेल्या प्रॉपर्टीसाठी तिच्याशी भांडताय. एकवढंच काय तिच्या सूना तिच्यावर हात उगारतात. एवढं करून त्यांना समाधान मिळालं नसावं म्हणून तिच्यावर खोटा आड आणून तिची पोलीस ठाण्यात त्यानी तक्रारही केली.

हे सगळं बघताना मनात एकच वादळ उठत होतं. जी स्त्री एक आई म्हणून, एक पत्नी, बहीण, वहिनी बनून सगळ्यांना जपते, सगळ्यांसाठी झटते ती मुलांच्या लग्नानंतर सासू म्हणून सूनेला जड होते आणि असली निर्लज्ज मुले तिला तिनेच कष्टाने कमावलेल्या प्रॉपर्टीवर हक्क दाखवतात. त्यासाठी भांडतात. (Mothers Day)

तरुण पिढीला पैशांची धुंद, तरुणपणाचा गर्व आणि बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर दिसत असतात. पण आई ही देवाने मुलांसाठी पाठवलेली अनमोल भेट आहे हे ते विसरतात. मात्र ही वेळ काही वर्षांनी का होईना त्यांच्यावरही येणारच आहे. त्यावेळी आजच्या तरुण पिढीचं मनोबल निश्चितच तुमच्या आईएवढं प्रबळ नसणार. तुमच्या मुलांनीही तुम्हाला अशीच वागणूक दिली तर कुठे जाणार तुम्ही?...प्रश्न तर पडलाय पण उत्तर सापडेना...

Mother’s Day
आईच्या उपचारासाठी पैसे नव्हते! किडनी विकण्यासाठी अल्पवयीन मुलगा पोहोचला हॉस्पिटलमध्ये | Mother and Son

निदान आजच्या तरुण पिढीने त्यांच्या मुलांवर चुकीचे संस्कार पडू नये यासाठी तरी शिस्तीत वागण्याची गरज आहे. नाहीतर तुम्ही आज जसे वागताय त्याची परतफेड तुमची मुलं तुम्हाला देतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com