चित्रपटांमुळे मिळाली नवी ‘दृष्टी’

मला भीतीदायक चित्रपट पाहायला आवडत नाही. ‘शोले’, ‘लगान’, ‘उंबरठा’, ‘अशी ही बनवाबनवी’ असे चित्रपट आवडतात. चित्रपट केवळ तीन तासांचा असतो; परंतु त्यामागे महिना, दोन महिने, काही वेळेस तर वर्षापेक्षाही जास्त मेहनत असते.
Bhargavi Chirmule
Bhargavi Chirmule sakal
Updated on

भार्गवी चिरमुले

मला चित्रपट पाहण्याची खूप आवड आहे. हा छंद कुठेही जोपासता येतो. कारण ओटीटीचे नवे व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध आहे. लोक चित्रपट केवळ मनोरंजन म्हणून पाहतात; पण तसे नाही. त्यातूनही खूप शिकण्यासारखे आहे. कारण चित्रपट पाहताना तुम्हाला स्वत:ला तुमची आवड समजून घेऊन ती वाढवावी लागते. तुम्हाला कोणत्या पद्धतीचे चित्रपट पहायला आवडतात, त्यानुसार तुमचे व्यक्तिमत्त्व कसे आहे हे समजते. तुमची विचारसरणी कशी आहे हे कळते. एखाद्या घटनेकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे या गोष्टी कळतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com