Mrunal Panchal : खरी फॅशन आयकॉन तर मृणाल आहे राव; तिचे फॅशन ट्रेंड पाहून पब्लिक फिदा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mrunal Panchal

Mrunal Panchal : खरी फॅशन आयकॉन तर मृणाल आहे राव; तिचे फॅशन ट्रेंड पाहून पब्लिक फिदा!

प्रसिद्ध सोशल मीडिया आयकॉन मृणाल पांचाळ अनेक दिवसांपासून अनिरुद्ध शर्माला डेट करत आहे. नुकतेच त्यांनी साखरपुडा उरकून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. मृणालने तिच्या एंगेजमेंटचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या हातात एंगेजमेंट डायमंड रिंग दिसत आहे. लॅव्हेंडर रंगाच्या सूटवर मल्टीकलर दुपट्टा घेतला असून या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

मृणाल नेहमीच तिच्या ग्लॅमरस लुक आणि मेकअप स्टाइलने सर्वांना प्रभावित करताना दिसते. फॅशन ब्लॉगर मृणाल पांचालने तिचा बॉयफ्रेंड प्रसिद्ध युट्युबर अनिरुद्ध शर्मासोबत साखरपुडा केला आहे. ज्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या खास कार्यक्रर्माचे काही फोटो मृणालने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सूटसोबत अनेक रंगांचा लाल रंगाचा दुपट्टा परिधान करताना दिसत आहे. ज्यामध्ये तिचा लूक पाहण्यासारखा आहे. तर तिचा बॉयफ्रेंड अनिरुद्धनेही या लूकसोबत ट्युनिंग केले आहे.

लॅव्हेंडर कलरच्या कुर्त्यामध्ये तो खूपच देखणा दिसत आहे. मृणाल मेकअप टिप्स देण्यात एक्सपर्ट आहेच. पण तिची फॅशन स्टाइलही खूपच अप्रतिम आहे. पांढऱ्या रंगाच्या फ्रॉक स्टाइल ड्रेसमध्ये ती किती सुंदर दिसत आहे.

हेही वाचा: Heeraben Modi Demise Live Updates : PM मोदींच्या मातोश्रींना अखेरचा निरोप; गांधीनगरमध्ये अंत्यसंस्कार

तुम्ही मृणालला कॉपी करत असाल तर हा लुक नक्की ट्राय करा. मृणालने क्रॉप स्वेटर शर्ट आणि शॉर्ट्ससोबत असा लाँग ब्लेझर घातला आहे. जे तुम्हाला एक बेस्ट लुक देईल.

हेही वाचा: Heeraben Modi Demise Live Updates : PM मोदींच्या मातोश्रींना अखेरचा निरोप; गांधीनगरमध्ये अंत्यसंस्कार

जर तुम्हाला लाइट शेड्स आवडत असतील तर तुम्ही हा लूक कॅरी करू शकता. व्हाईट टॉप, ऑफ व्हाइट कोटी आणि मॅचिंग बॅगी पँट, स्टायलिश बॅग आणि पांढरे शूज परफेक्ट दिसत आहेत.