
प्राप्ती रेडकर, अभिनेत्री
माझ्यासाठी माझी आई ज्योती रेडकर ही माझं संपूर्ण जग आहे. ती माझी जीवनवाहिनी आहे. तिच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण वाटतं. तिची साथ नसली, तर मी कोणतीच गोष्ट पूर्ण करू शकत नाही. मी जे काही करते, ते सगळं तिच्या सल्ल्यानुसारच. कोणताही निर्णय घेण्याआधी मी आईला विचारते, मग तो निर्णय कितीही लहान असो वा मोठा. ‘‘आई, मी हे करू का?’’, ‘‘आई, मी ते करू का?” असे प्रश्न सतत मी विचारत असते. कारण मला माहिती आहे, की आईनं एखाद्या गोष्टीला नकार दिला, तर ती गोष्ट चुकीची असणार. तिचा सल्ला म्हणजे माझ्यासाठी मार्गदर्शक प्रकाश आहे.