

She believes the audience's emotional response is the greatest reward for an actor and hopes such meaningful stories reach more people through films and television.
Sakal
सुकन्या कुलकर्णी-मोने, अभिनेत्री
जवळपास वर्षभर दीपक गोडबोले मला ‘ताई, नाटक करा. माझ्याकडे एक खूप छान नाटक आहे,’ असं सतत सांगत होते; पण त्या काळात माझ्या मनात नाटक करण्याचा अजिबात विचार नव्हता. त्यात माझी मुलगी जुलिया आमच्याकडे आली होती. ती इथं असेपर्यंत मी कोणताही नवीन प्रोजेक्ट स्वीकारणार नाही, असं मी ठरवलं होतं. त्यामुळे जुलिया परत गेल्यावर आपण नाटकाबद्दल बोलू, असं दीपकला सांगितलं होतं.