National Dengue Day 2024: आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन

National Dengue Day 2024: डेंग्यूचा प्रसार हा ‘एडिस इजिप्टाय’ नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. यासाठी कोणतेही पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त साठवू नये, याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
National Dengue Day 2024
National Dengue Day 2024Sakal

National Dengue Day 2024: संभाजीनगरमध्ये मागील चार वर्षांत ६०५ डेंग्यू दूषित रुग्ण आढळले. डेंग्यूचा ताप विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा ‘एडिस इजिप्टाय’ नावाच्या डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. यासाठी कोणतेही पाणी आठ दिवसांपेक्षा जास्त साठवू नये, याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे, तरच डासाची उत्पत्ती कमी करून नियंत्रणात ठेवता येईल, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

नांदेड जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांत ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ गुरुवारी (ता. १६) साजरा होत आहे. २०२४ यावर्षीचे घोषवाक्य ‘समुदायाच्या संपर्कात राहा, डेंग्यूला नियंत्रित करा’ असे आहे.

डेंग्यू ताप आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरूपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायुदुखीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्तस्त्राव होतो. अशक्ततपणा येणे, भूक मंदावते, तसेच तोंडाला कोरड पडते ही लक्षणे प्रामुख्याने दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करून घेणे आवश्यक आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

आपल्या घराभोवताली पाणी साचू देऊ नका.

झोपताना पूर्ण अंगभर कपडे घालावीत, पांघरून झोपावे.

सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत दारे खिडक्या बंद कराव्यात. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. झोपताना चांगल्या मच्छरदाणीचा वापर करावा.

आपल्या घरी कीटकनाशक औषधी फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारून घ्यावे. फवारलेले घर किमान दोन ते अडीच महिने सारवून रंगरंगोटी करू नये.

घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी आदींची वेळीच विल्हेवाट लावावी.

National Dengue Day 2024
National Dengue Day 2024 : डेंग्यूचे डास जवळपास फिरकणार ही नाहीत, फक्त तुमच्या दिनचर्येत करा 'हे' बदल

४०० मीटरपर्यंत उडतो एडिस डास

‘एडिस इजिप्टाय’ हा डास पाच ते सहा मि.मी. लांबीचा असतो. अंगावर पांढरे चट्टे असतात. त्यामुळे याला ‘टायगर मॉस्किटोही’ म्हणतात. तो दिवसा चावतो. वारंवार चावा घेतो. त्यामुळे आजाराची शक्यता वाढते. हा डास ४०० मीटरपर्यंत उडू शकतो. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. हा डास लोंबकळणाऱ्या वस्तू जसे दोरी, लाइटची वायर, छत्री, काळे कपडे आदी ठिकाणी विश्रांती घेतो.

नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाही. योग्य काळजी आणि वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी कीटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे.

- डॉ. संतोष सूर्यवंशी, जिल्हा हिवताप अधिकारी, नांदेड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com