National Egg Day 2024: अंडी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? वाचा एका क्लिकवर

National Egg Day 2024: आज राष्ट्रीय अंडा दिवस साजरा केला जात असून अंडी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.
National Egg Day 2024
National Egg Day 2024Sakal

National Egg Day 2024: अंडी खाणे आरोग्यदायी असते. यामध्ये प्रथिने,कॅलरीज, कॅल्शिअम, व्हिटॅमिन बी १२ यासारखे अनेक पोषक घटक असतात. अनेक लोक वजन वाढवण्यासाठी आणि व्हिटॅमिन बी १२ची कमतरता भरून काढण्यासाठी अंड्याचे सेवन करतात. तसेच अंड्यापासून ऑमलेट, भुर्जी, सँडविच, अंडा करी यासारखे अनेक पदार्थ बनवले जातात. पण बाजारातून अंडी खरेदी करताना ती खराब आहे की चांगली आह हे ओळखण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

अंडी खराब होऊ शकतात का?

अंड्याला अनेक कारणांमुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. यामध्ये साल्मोनेला सारख्या जिवाणूंचा समावेश असतो. जे अंड्याच्या कवचावर किंवा अंड्याच्या आत असू शकतात. पण खरं तरं अनेकवेळा संसर्ग कोंबड्यामुळे देखील पसरू शकतो. खराब अंडी खाल्ल्यास पोटाचे आजार, ताप किंवा उलट्या होऊ शकतात. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांच्या मते अंडी नेहमी शिजवून खाण्याचा सल्ला देतात.

अंड्याचे कवच

किराणा दुकानातून अंडी खरेदी करण्यापूर्वी नेहमी अंड्याच्या कवचाची तपासणी करावी. अंड्याला कोणतीही तडा किंवा अंडी तुटलेली खरेदी करू नका. तुटलेले अंडे जिवाणू वाढवू शकतात आणि यामुळे अंडी खराब होऊ शकतात.

गुणवत्ता

अंडी खरेदी करताना नेहमी स्वच्छ आणि अखंड कवच असलेले खरेदी करावे. अंड्याचे कवच अस्वच्छ किंवा असामान्य रंग असलेले डाग असेल तर खरेदी करू नका. कारण असे अंडे लवकर खराब होतात.

पॅकेजिंग

अंडी योग्यरित्या पॅक केलेली आणि फ्रिजमध्ये स्टोअर केलेले खरेदी करावे. फ्रिजमध्ये नसलेली किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवलेले अंडे खरेदी करणे टाळावे. यामुळे बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते.

आकार

अंडी लहान, मध्यम, मोठी आणि अति मोठ्या अशा वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असतात. तुमच्या आवडीनुसार किंवा रेसिपीच्या गरजेनुसार अंड्यांचा आकार निवडावा. नेहमी आकार तपासा, जर अंडी वेगळ्याच आकाराची दिसत असेल तर खरेदी करू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com