National Girlfriend Day : गर्लफ्रेंडला खुश करायचंय? या 5 टिप्स कामी येतील; वाढवतील नात्यातला गोडवा

आज गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठीच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
National Girlfriend Day
National Girlfriend Dayesakal
Updated on

National Girlfriend Day : हल्ली डिजीटलायझेनच्या युगात डेटिंग अॅप्स, मॅट्रोमोनियल साइट्स यांच्या वापरामुळे लग्नासाठी जोडीदार, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड शोधणं सहज आणि सोपं झालंय. मात्र या अॅप्सच्या माध्यमातून बऱ्याच जणांची फसवणूकसुद्धा होते. त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत नातं टिकवण्यासाठी आणि ते आनंदी खुलवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या अभावामुळे अनेकांचा ब्रेकअप होतो. तेव्हा आज गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठीच्या काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गर्लफ्रेंडला खुश कसं कराल?

डेट नाइटवर जा

तुम्ही बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये असाल तर डेट नाइट फार महत्वाची आहे. याशिवाय तुम्ही जेव्हा गर्लफ्रेंडला बाहेर घेऊन जाता तेव्हा आपण कोणासाठीतरी खास असण्याची जाणीव होते आणि तिचा आनंद द्विगुणीत होतो.

मूव्ही नाइट प्लान करा

गर्लफ्रेंडसाठी मूव्ही नाइट प्लान करा. दिवसभरातील कामाच्या थकव्यापासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही मिळालेल्या वेळेत दोघांच्याही आवडीचा एखादा चित्रपट बघू शकता. यामुळे दोघांचाही ताण थोड्या प्रमाणात कमी होऊन आनंदाचे क्षण एकत्र घालवता येतील.

National Girlfriend Day
Girlfriend On Rent : सिंगल आहात? इथे मिळते भाड्याने गर्लफ्रेंड; जाणून घ्या

पँपर करा

मुलींना पँपरिंग करणे फार आवडते. आज गर्लफ्रेंड डे ला तिला चॉकलेट, गिफ्ट्स आणि तिच्या काही आवडत्या वस्तू तिला द्या. तुम्ही गर्लफ्रेंडला पेडिक्युअर, मॅनीक्युअर किंवा स्पासाठीही घेऊन जावू शकता.

चांगलं गाणं सेंड करा

तुमच्या गर्लफ्रेंडला तुमच्या नात्यावर आधारित गाणं पाठवा. तुमच्या गर्लफ्रेंडला नक्कीच लव्ह साँग आवडेल. तुम्ही शब्दात ज्या भावना व्यक्त करू शकत नाही त्याला तिला गाण्याच्या माध्यामातून सांगू शकता. (Lifestyle)

National Girlfriend Day
गर्लफ्रेंडसाठी पायलटने तोडले नियम! कॉकपीठमध्ये बसवत प्रवास; दारू, स्नॅक्स अन्... | Girlfriend

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com