

National Unity Day 2025 | History, Thesme and Signficance
sakal
Why We Celebrate Rashtriya Ekta Divas: भारतामध्ये दरवर्षी ३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. स्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या एकत्रीकरणाच्या कार्यामुळे ते आजही लोकांच्या मनात आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर विखुरलेल्या राज्यांना एकत्र करून भारतात एकता निर्माण केली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना 'भारताचे लोहपुरुष' म्हणून ओळखले जाते. म्हणूनच ३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो.