
Chemical-free ways to remove makeup naturally: चेहऱ्यावरचा मेकअप व्यवस्थित आणि पूर्णपणे निघाला नाही तर चेहऱ्यावर लवकरच सुरकुत्या यायला सुरवात होऊ शकते. त्यामुळे योग्य पद्धतीने मेकअप उतरवणं आवश्यक आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या मेकअप रिमूव्हरव्यतिरिक्त आपण घरगुती पद्धतीनंही मेकअप कसा काढावा हे बघूया.
त्वचेसाठी नारळाचं तेल चांगलं असतं. मेकअप काढण्यासाठीही याचा चांगला फायदा होतो. नारळाचं तेल चेहऱ्यावर लावून, कापसानं चेहरा स्वच्छ करून घ्या.