- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
आजच्या धकाधकीच्या जीवनात केसगळती हा त्रास अनेकांना असतो. कधी-कधी ही समस्या एवढी वाढते, की टक्कल पडण्याची वेळ येते. सततचा ताण, चुकीचा आहार, पचनसंस्था कमजोर होणे, झोपेची कमतरता आणि हार्मोनल असंतुलन हे सर्व केसांच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात. योग हा या समस्येवर एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतो.