esakal | जीभ भाजल्यावर करा 'हे' उपाय; निश्चितपणे त्रास होईल कमी!
sakal

बोलून बातमी शोधा

जीभ भाजल्यावर करा 'हे' उपाय; निश्चितपणे त्रास होईल कमी!

जीभ भाजल्यावर करा 'हे' उपाय; निश्चितपणे त्रास होईल कमी!

sakal_logo
By
शर्वरी जोशी

अनेक जणांना थंड झालेले पदार्थ खाणं अजिबात आवडत नाही. त्यामुळे हे लोक जेवण किंवा चहा, कॉफी गरम असतानाच त्यांचं सेवन करतात. परंतु, अनेकदा हे पदार्थ घाईघाईत खाल्ल्यामुळे किंवा प्यायल्यामुळे पटकन जीभ भाजली जाते. त्यामुळे एकदा का जीभ भाजली की नंतर इतर कोणताही पदार्थ खाताना त्रास जाणवतो. अगदी तिखट, गरम पाणी किंवा एखादा कडक पदार्थ खातांनाही जीभेला त्रास होतो. म्हणूनच, हा त्रास टाळायचा असेल तर जीभ भाजल्यावर काय करावं हे जाणून घेऊयात. (natural-ways-to-treat-a-burnt tongue)

१. गार पाणी -

जीभ भाजल्यानंतर हळूहळू गार पाणी प्या. पाणी हळू प्यायल्यामुळे जीभेवर होत असलेली दाह कमी होण्यास मदत मिळते.

हेही वाचा: Monsoon Lips Care Tips: पावसाळ्यात घ्या ओठांची काळजी!

२. बर्फ -

थंड पाणी प्यायल्यानंतरही जर जीभेची दाह कमी होत नसेल तर बर्फाचे काही तुकडे जीभेवर वर्तुळाकार पद्धतीने फिरवा. त्यामुळे नक्कीच आराम मिळेल.

३. मध -

मध लावल्यामुळेही जीभेला होणारा त्रास कमी होऊ शकतो. मधामध्ये अँटी मायक्रोबायल घटक असतात. त्यामुळे जीभ जास्त पोळून जखम झाली असेल तर तीदेखील बरी होते.

हेही वाचा: केस धुतल्यावर सतत डोकं खाजतंय? घ्या 'ही' काळजी

४. दूध प्या -

गार दूध प्यायल्यामुळे जीभेला होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत मिळतात. यावेळी तुम्ही साखर घातलेलं दूधदेखील पिऊ शकता.

५. तिखट पदार्थ टाळा -

जीभ भाजल्यानंतर साधारणपणे २-३ तास तिची जळजळ होत असते. कोणताही पदार्थ खाल्ला तरीदेखील लगेच त्रास होतो. त्यामुळे शक्यतो अशा वेळी तिखट आणि गरम पदार्थ खाणं टाळा.

loading image