esakal | केस धुतल्यावर सतत डोकं खाजतंय? घ्या 'ही' काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

केस धुतल्यावर सतत डोकं खाजतंय? घ्या 'ही' काळजी

केस धुतल्यावर सतत डोकं खाजतंय? घ्या 'ही' काळजी

sakal_logo
By
शर्वरी जोशी

लांबसडक, काळेभोर केस असावेत असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र, असे घनदाट केस हवे असल्यास केसांची तितकी काळजीही घ्यावी लागते. केवळ केसांचीच नव्हे तर टाळूची म्हणजेच स्कॅल्पचीही काळजी घ्यावी लागते. बऱ्याचदा ऋतू बदलला किंवा आहारात काही बदल झाला तर त्याचा परिणाम केसांवर आणि स्कॅल्पवर दिसून येतो. वारंवार डोक्यात खाज येणे, केसात उवा होणे, कोंडा होणे यासारख्या समस्या निर्माण होतात. विशेष म्हणजे या समस्येपासून सुटका करुन घेण्यासाठी आपण ना ना विविध उपचार करतो. इतकंच नाही तर काही जण आठवड्यातून ३-४ वेळा सातत्याने केस धुतात. परंतु, अनेकदा केस धुतल्यावर डोक्यातील खाजेचं प्रमाण वाढतं. म्हणूनच केस धुतल्यावर डोख्यात खाज का येते हे जाणून घेऊयात. (beauty-itchy-scalp-day-after-washing-hair-know-reason)

१. अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन -

केसांमधील तेलकटपणा, कोंडा जाण्यासाठी बाजारात सध्या विविध ब्रॅण्डचे शॅम्पू, कंडिशनर, हेअर मास्क, हेअर सिरीम उपलब्ध आहेत. अनेकदा आपण या वस्तूंची गुणवत्ता न तपासता ते खरेदी करतो. मात्र,यांच्याच वापरामुळे अनेकदा आपल्याला अ‍ॅलर्जीच्या समस्येला सामोरं जावं लागतं. शॅम्पू किंवा कंडिशनर तयार करत असताना त्यांच्यात रासायनिक पदार्थांचा वापर करण्यात आलेला असतो. त्यामुळे अनेकदा या घटकांमुळेही अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. परिणामी, केस धुतल्यानंतर डोक्यात खाज येऊ शकते.

२. स्वच्छतेची काळजी घ्या -

ज्याप्रमाणे आपल्या शरीरावर घाम येत असतो. तसाच घाम केसांमध्येही येत असतो. त्यामुळे केसांमधील चिकटपणा, ओलसरपणा वाढतो आणि केसांमध्ये उग्र दर्प येतो. इतकंच नाही तर सतत घाम आल्यामुळे केसांमध्ये मळ होतो. आणि, परिणामी डोक्यामध्ये खाज सुटते.म्हणूनच, केसांची नीट काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कधीही केस धुतांना कोमट पाण्याचा वापर करावा. तसंच बाहेर जाऊन आल्यानंतर केस काही काळ मोकळे सोडावेत. केस ओले असताना त्यावर तेल लावू नये.

३. ड्राय स्कॅल्प-

अनेकांचा स्कॅल्प कोरडा असल्यामुळे डोक्यात वारंवार खाज येते. त्यामुळे अशा व्यक्तींनी शक्यतो सौम्य शॅम्पू किंवा कंडिशनरची निवड करा. तसंच घरी तयार केलेल्या तेलाचा वापर करावा.

हेही वाचा: कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या शिक्षिकेवर आली कचरा उचलण्याची वेळ

४. स्टालिंग टूलमुळेही होतं नुकसान-

केसांच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी अनेक जण स्टालिंग टूलच्या मदतीने वेगवेगळ्या हेअर स्टाईल करत असतात. मात्र, वारंवार स्टालिंग टूल वापरल्यामुळे केसांचं नुकसान होतं. केस गळू लागतात. तसंच काही प्रोडक्ट्समुळे डोक्यात खाज येते.

loading image