Navratri 2022: नवरात्रीला या चार चुका टाळा आन् घरी आणा या ४ गोष्टी, होईल धनलाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri 2022

Navratri 2022: नवरात्रीला या चार चुका टाळा आन् घरी आणा या ४ गोष्टी, होईल धनलाभ

Vastu Tips: नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली असून ठिकठिकाणी आपल्याला आनंदोत्सव साजरा होताना दिसतोय. मात्र या उत्साहात तुमच्याकडून काही चुका होता कामा नये याचीही तुम्ही काळजी घ्यायला हवी. त्यासाठी ज्योतिष शास्त्रात काही महत्वाच्या गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. तुमच्या घरात जर चार महत्वाच्या गोष्टी असतील तर तुम्हाला भरपूर प्रमाणात धनलाभ होऊ शकतो.

पीतळेचा हत्ती

वास्तु शास्त्रानुसार, तुमच्या घरात पितळेचा हत्ती असेल तर तुमच्या घरात सकारात्मकतेचा वास होतो. पितळेचा हत्ती फक्त नकारात्मकताच दूर करत नाही तर तुमच्यासाठी यशाचे दरवाजेही उघडे करतो.

हत्तीची प्रतिमा

घराच्या लिविंग एरियामध्ये जर हत्तीची प्रतिमा असेल तर धनलाभ होतो. प्रतिमेसाठी मूर्तीमध्ये हत्तीची सोंड वरच्या बाजूला असावी. यामुळे घरात सुख शांती नांदत असते. घरात हत्तीची प्रतिमा असणे शुभ मानलं जातं.

हेही वाचा: Vastu Tips : तुम्हीही आर्थिक संकटाचा सामना करत आहात का? आजच करा 'हे' वास्तु उपाय

चांदीचा हत्ती

घरी तिजोरीच्या जवळ चांदीचा हत्ती असावा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहाते. तसेच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते.

बेडरूममध्ये हत्तीची जोडी

वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये हत्तीची जोडी ठेवल्याने दांपत्य सुख वाढतं. पती पत्नीमध्ये असलेला वाद मिटतो.

घरच्या या दिशेने ठेवू नका हत्ती

हत्तीचं चित्र किंवा प्रतिमा दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवू नका. तसेच हत्तीची सोंड खालच्या बाजूला असलेला फोटो घरात लावू नका.